AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Health Tips : महिलांनो इकडे लक्ष द्या ! चांगलं आरोग्य हवं असेल कर जरूर खा हे पदार्थ, व्हाल तंदुरुस्त

आपल्या नेहमीच्या आहारातील असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने पोषक घटक मिळून आरोग्याला अनेक फायदे होतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

Women Health Tips : महिलांनो इकडे लक्ष द्या ! चांगलं आरोग्य हवं असेल कर जरूर खा हे पदार्थ, व्हाल तंदुरुस्त
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 28, 2023 | 2:31 PM
Share

नवी दिल्ली – घरचं काम, ऑफीसचं काम व्यस्त शेड्युलमुळे बऱ्याचशा महिलांना त्यांच्या तब्येतीकडे (woman health) नीट लक्ष देता येत नाही. बहुतांश महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दु्र्लक्ष होतं. याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर (effect on mental and physical health) वाईट परिणाम होतो. खराब दिनचर्या, चुकीचे खाणे आणि ताणतणाव यामुळे मासिक पाळी अर्थात पीरियड्सवरही (periods) परिणाम होतो. योग्य वेळी मासिक पाळी आली नाही तर तणाव आणखी वाढतो. जर तुम्हीही अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असाल तर या 5 गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा.

– निरोगी राहण्यासाठी महिलांनी दररोज आल्याचा चहा पिणे उत्तम ठरते. आल्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः अनियमित मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आलं उत्तम ठरतं. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे संयुग असते जे शरीरातील जळजळ आणि सूज कमी करते. यामुळे मासिक पाळी योग्य वेळी येते.

– महिलांसाठी गूळ हा देखील एक वरदान ठरतो. त्यामध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम आढळते. ज्यामुळे अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्तता होते. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर मासिक पाळी वेळच्या वेळी येते. गूळ हा उष्ण प्रकृतीचा असतो. त्यामुळे महिलांनी आहारात गुळाचा समावेश अवश्य करावा.

– आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मेथीचे पाणी प्यायल्यानेही मासिक पाळी नियमित होते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे घालून ते भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गरम करावे आणि नंतर गाळून हे पाणी प्यावे.

– जर तुम्हाला मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास दूर करायचा असेल तर आहारात हळदीचा अवश्य समावेश करावा. त्याच्या नियमित सेवनाने अनियमित मासिक पाळीचा त्रास दूर होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही हळद घातलेले दूध पिऊ शकता. याशिवाय रोजच्या भाज्या, आमटी तसेच लोणच्यामध्येही हळद घालूनही त्याचे सेवन करता येते.

– व्हिटॅमिन-सी ने समृद्ध असलेल्या पदार्थांमध्ये एस्कॉर्बिक ॲसिड देखील आढळते. हे आवश्यक पोषक तत्वं मासिक पाळीला चालना देण्यासाठी उपयुक्त असतात. त्यासाठी तुम्ही संत्रं, लिंबू , किवी, स्ट्रॉबेरी आणि गुजबेरी यांचे सेवन करू शकता. तुम्ही ही फळं कापून सेवन करू शकता किंवा त्यांचा रसही पिऊ शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.