AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या आहारात या ‘सुपरफूड्स’ चा समावेश हवाच…ते तुम्हाला ठेवतील अधिक फीट आणि उत्साही!

महिला आहार आणि अन्न: महिलांनी त्यांच्या आहारात दूध-दही, टोमॅटो, बेरी आणि आवळा यांसारखे ‘सुपरफूड’ समाविष्ट केले पाहिजे. त्यामुळे शरीराला कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, लोह आणि व्हिटॅमिन डी मिळते.

महिलांच्या आहारात या ‘सुपरफूड्स’ चा समावेश हवाच...ते तुम्हाला ठेवतील अधिक फीट आणि उत्साही!
Image Credit source: istockphoto.com
| Updated on: May 28, 2022 | 4:24 PM
Share

धावपळीच्या जीवनात महिला खूप व्यस्त असतात. विशेषतः नोकरदार महिलांच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी (Dual responsibility) येते. घर आणि संसाराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि नंतर नोकरी, ऑफिसच्या कामाचीही जबाबदारी असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा महिलांना घर आणि ऑफिस सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी (Health care) घेता येत नाही. अशा परिस्थितीत महिलांसाठी हेल्दी फूड अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी आवश्यक असलेल्या सुपरफूड्सबद्दल सांगत आहोत. ज्याला तुम्ही तुमच्या आहाराचा भाग बनविल्यास, तुम्हाला अधिक काळ फीट आणि उत्साही (Feet and enthusiasts) राहता येईल. महिलांनी त्यांच्या आहारात दूध-दही, टोमॅटो, बेरी आणि आवळा यांसारखे सुपरफूड समाविष्ट केले पाहिजे. त्यामुळे शरीराला कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, लोह आणि व्हिटॅमिन डी मिळते. कुठलाही आहार घेतांना त्यातून कीती कॅलरीज मिळत आहेत याचा विचार महिलांनी नेहमीच करावा.

टोमॅटो– टोमॅटोला महिलांसाठी सुपरफूड म्हटले जाते. त्यात लाइकोपीन नावाचे पोषक तत्व असते ज्याला पॉवर हाऊस म्हणतात. लाइकोपीन स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयरोगाशी लढण्यास मदत करतात. टोमॅटो त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वृद्धत्व टाळण्यास मदत करते.

दूध किंवा संत्र्याचा रस- महिलांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता खूप जास्त असते. अशा परिस्थितीत तुम्ही कमी चरबीयुक्त दूध किंवा संत्र्याचा रस आहारात समाविष्ट केला पाहिजे. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम देखील दूध आणि संत्र्याच्या रसात आढळते. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम पोहोचवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

बीन्स– बीन्स खाल्ल्याने हृदयविकार आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. बीन्समध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात परंतु चरबीचे प्रमाण खूपच कमी असते. बीन्स महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. बीन्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. सोयाबीन- महिलांनी आपल्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बी असलेले अन्न तुम्ही अन्नात घेतले पाहिजे. यासाठी सोयापासून बनवलेले पदार्थ जसे की सोया मिल्क आणि टोफू यांचा आहारात समावेश करू शकता.

दही– महिलांनी दही अर्थात कमी चरबीयुक्त दही खावे. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की दही खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. दही पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासही मदत करते. दही खाल्ल्याने अल्सर आणि योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो

बेरी– महिलांच्या आरोग्यासाठी बेरी खूप फायदेशीर असतात. आपण स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी खाणे आवश्यक आहे. त्यामध्ये कॅन्सरविरोधी पोषक घटक आढळतात. बेरी महिलांना स्तन आणि कोलन कर्करोगापासून वाचवण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. गर्भधारणेदरम्यान बेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं