AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss: जगातील श्रीमंत व्यक्ती तरुण दिसण्यामागचं रहस्य आहे ‘हे’ औषध, वय 50 पण दिसतो 30 चा…

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य आता उघड केले आहे.

Weight loss: जगातील श्रीमंत व्यक्ती तरुण दिसण्यामागचं रहस्य आहे 'हे' औषध, वय 50 पण दिसतो 30 चा...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 31, 2022 | 6:59 PM
Share

नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य आता उघड केले आहे. त्यांनी सांगितले आहे की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, उपवासासह, ते वीगोवी नावाचे विशेष प्रकारचे औषधही घेतात. एलोन मस्क वयाच्या 51 व्या वर्षीही 30-32 वर्षांच्या तरुणासारखा दिसतात. अनेकदा ट्विटरवर अनेक लोक त्यांच्याकडून त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

अलीकडेच, पुन्हा एकदा त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर विचारले आहे की, तुम्ही खूप छान दिसता, ते वेट लिफ्टिंग आणि हेल्दी डाएट करता का? या प्रश्नाला उत्तर देताना मस्कने ट्विट करून ‘फास्टिंग अँड वीगोवी’ असे म्हटले आहे.

यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने गेल्या वर्षी वीगोवी या औषधाला वजन कमी करणारे औषध म्हणून मान्यता देण्यात आली होती.

मधुमेह असेल तर त्याचा उपचारात याचा वापर केला जात असतो. तरीही ते आता वजन कमी करणारे औषध म्हणूनही ते झपाट्याने प्रसिद्ध होत आहे.

वीगोवी ही डॅनिश फार्मास्युटिकल कंपनी Novo Nordisk च्या Semaglutide औषधाची पुढील प्रकार आहे. जो शरीरात भूक निर्माण करणाऱ्या संप्रेरकांना संतुलित करते.

त्यामुळे दीर्घकाळ भूक कमी कमी होत जाते. हे औषध लठ्ठ व्यक्तीला आठवड्यातून एकदा इंजेक्शन दिले जाते. हे औषध 68 आठवड्यात 15 ते 20 टक्के वजन कमी करते आणि त्याचा प्रभावही खूप काळ टिकून राहत असल्याचे सांगितले जाते.

हे औषध फक्त अशा लोकांसाठी दिले जाते जे खूप लठ्ठ आहेत आणि ज्यांचे वजन लठ्ठपणाच्या निर्धारितेपेक्षा जास्त आहे. किंवा जे लोक मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. ते लोकही हे औषध वापरतात.

अमेरिकन वेबसाईट ‘व्हेरायटी’नुसार, अनेक सेलिब्रिटींनी वजन कमी करण्यासाठी या अत्यंत महागड्या औषधाचा वापर सुरू केला आहे.

ज्यामुळे त्याची कमतरतादेखील भासू लागली आहे. या औषधाच्या एका महिन्याच्या डोसची किंमत सुमारे 98 हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम, कमी-कॅलरी आणि निरोगी आहाराचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?