AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर

झायडस कॅडिलाकडे कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 28 हजार स्वयंसेवकांवर केल्याची माहिती आहे. देशातील एकूण 50 ठिकाणी चाचणी घेण्यात आली. (Zyduc Cadila Zycov-D)

भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर
कोरोना लस
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज केला आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. लसीची विशेषता म्हणजे लस घेण्यासाठी इंजेक्शनचा वापर करावा लागत नाही. (Zydus Cadila apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine know all details)

डीएनएवर आधारित कोरोना लस

झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणारी झायडस कॅडिला ही दुसरी कंपनी आहे. तर, डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील पहिली लस आहे. या लसीमध्ये विषाणच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करुन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

28 हजार स्वयंसेवकांवर चाचणी

झायडस कॅडिलाकडे कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 28 हजार स्वयंसेवकांवर केल्याची माहिती आहे. देशातील एकूण 50 ठिकाणी चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत, अशी माहिती आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस वेरिएंटवर झायकोव्हडी लस प्रभावी असल्याचा दावा केला जातो.

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

सुईविना लस घेता येणार

झायकोव-डी लसीची निर्मिती फार्माजेट तंत्रंज्ञानावर करण्यात आली आहे. यामुळे झायकोव-डी लस घेताना सुईचा वापर करण्याची गरज नाही. सुई नसणाऱ्या इंजेक्शनमध्ये लस भरली जाते. ते इंजेक्शन एका मशीनवर लाऊन ते हातावर लावलं जातं आणि कोरोना लस आपल्या शरीरात जातं. झायडस कॅडिलानं या लसीचे 10 ते 12 कोटी डोसची निर्मितीचा दावा केला आहे. झायकोव्हडीचे तीन डोस घ्यावे लागतात. या लसीचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असा दावा करण्यात आला आहे. झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी 12 ते 18 वयोगटाच्या मुलांवर देखील झाली आहे. झायकोव्ह डी लसची परिणामकारता 66 टक्के असल्यास सुरुवातीला दिसून आलं होतं.

संबंधित बातम्या:

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

(Zydus Cadila apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine know all details)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.