AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारतावर 0 टक्के टॅरिफ? अमेरिकेत घडामोडींना वेग, थेट पत्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर फक्त भारतालाच नाही तर अमेरिकेलाही मोठा धक्का बसला. भारतासाठी अमेरिका ही एक मोठी व्यापारपेठ राहिली आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत व्यापार संबंध होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे वाटोळे झाले.

मोठी बातमी! भारतावर 0 टक्के टॅरिफ? अमेरिकेत घडामोडींना वेग, थेट पत्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी...
Donald Trump Tariffs
| Updated on: Oct 09, 2025 | 8:54 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफला फक्त भारतातूनच नाही तर अमेरिकेतूनही जोरदार विरोध होत आहे. या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद आहे. भारतातून अमेरिकेत होणारे मोठी निर्यात बंद झाली असून भारत हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध मार्ग शोधत आहे. नुकताच काही देशांसोबत मुक्त व्यापार करार भारताने केला. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत, रशिया आणि चीन देखील एकाच मंचावर आले.

भारतावर इतका मोठा टॅरिफ लावल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. अमेरिकेतील 19 खासदारांनी एक पत्र लिहून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठी मागणी केली. भारतासोबतचे संबंध सुधारा आणि भारतावर झिरो टॅरिफ लावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले. खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांनी हे पत्र डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिले. त्यांनी म्हटले की, भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा थेट परिणाम दोन्ही देशातील व्यापारावर झालाय.

भारत-अमेरिका व्यापार भागीदार आहेत. अमेरिकेत निर्माण होणाऱ्या काही गोष्टींसाठी भारतीय वस्तूंवर आधारित राहवे लागते. टॅरिफमुळे अमेरिकेतील उद्योगांवर थेट परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या कंपन्यांना देखील भारतीय वस्तूंचा मोठा फायदा होतो. भारतातून अमेरिकेत कमी निर्यात होत असल्याने अमेरिकेतील नोकऱ्या देखील धोक्यात आल्या आहेत. आपण भारतासोबत चुकीचे वागत असल्याने भारत चीन-रशिया यांच्या अधिक जवळ जात आहे.

हे अमेरिकेसाठी अत्यंत धोकादायक आहे. अमेरिकेला चीनच्या विरोधात लढायचे असेल तर भारत खूप जास्त महत्वाचा आहे. भारत रशिया आणि चीनच्या जवळ जात असल्याने हा अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे, असेही या खासदारांनी आपल्या पत्राता म्हटले. हेच नाही तर त्यांनी स्पष्टपणे मागणी करत म्हटले की, भारतावरील टॅरिफ झिरो करा. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेमका काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरोखरच भारतावरील टॅरिफ झिरो होणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Follow Us
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?