AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणची एक घोषणा अन् भारतासाठी 3 आनंदाच्या बातम्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना होणार फायदा

Good News For India : इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुज पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारताला 3 आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत.

इराणची एक घोषणा अन् भारतासाठी 3 आनंदाच्या बातम्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना होणार फायदा
India and iranImage Credit source: Google
| Updated on: Apr 17, 2026 | 10:38 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जहाज वाहतूक प्रभावित झाली आहे. कारण युद्धाच्या काळात इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुजकडे लागले होते, कारण जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि गॅस पुरवठा याच मार्गाने होतो. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली होती. मात्र आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुज पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारताला 3 आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण

इराणने होर्मुज खुला करण्याची घोषणा करताच 8 वाजता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 12% घसरून 83 डॉलर प्रति बॅरलवर आल्या, तर ब्रेंट क्रूडमध्ये 11% पेक्षा जास्त घट होऊन किंमत सुमारे 87 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती फेब्रुवारीतील नीचांकी स्तराजवळ पोहोचल्या आहेत. किमती कमी झाल्याने भारताच्या आयात खर्चात घट होईल, परिणामी इंधनाच्या किमती वाढण्याचा धोका कमी झाला आहे. याचा फायदा गल्ली ते दिल्लीपर्यंत होणार आहे.

शेअर बाजार वधारण्याची शक्यता

होर्मुज मार्ग खुला झाल्याने पुरवठा साखळीतील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. ही बातमी भारतीय बाजार बंद झाल्यानंतर आली असली तरी लगेचच गिफ्ट निफ्टीमध्ये 2% म्हणजेच 400 अंकांहून अधिक वाढ झाली. यावरून सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी उसली पहायला मिळण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे HPCL, BPCL, IOC, पेंट, टायर आणि विमान वाहतूक क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी होऊ शकते.

सोने आणि चांदीत तेजी

सामान्यतः तणाव कमी झाल्यास सोन्याच्या किमती कमी होतात. मात्र मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले होते आणि त्यांनी सोने-चांदीत गुंतवणूक टाळली होती. आता होर्मुज खुला झाल्याने आणि युद्धाचा धोका कमी झाल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोने-चांदीकडे वळत आहेत. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात MCX वर चांदी 5% वाढीसह सुमारे 2.61 लाख रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे, तर सोन्याच्या किमतीत 1.50% वाढ होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 1.55 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...