AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News: चीनमध्ये लॉकडाऊन पुन्हा परतला, 3 कोटी जनता लॉकडाऊनखाली, पुण्याएवढ्या शहरांमध्ये पुन्हा सुनसान रस्ते

चीनमध्ये (China) कोरोनाचा (corona) संसर्ग पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. चीनच्या अनेक शहरात तिथल्या सरकारने लॉकडाऊन (lockdown) लावला आहे.

Big News: चीनमध्ये लॉकडाऊन पुन्हा परतला, 3 कोटी जनता लॉकडाऊनखाली, पुण्याएवढ्या शहरांमध्ये पुन्हा सुनसान रस्ते
चीनमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. Image Credit source: google
| Updated on: Mar 15, 2022 | 2:51 PM
Share

मुंबई – चीनमध्ये (China) कोरोनाचा (corona) संसर्ग पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. चीनच्या अनेक शहरात तिथल्या सरकारने लॉकडाऊन (lockdown) लावला आहे. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये अनेक शहरांमध्ये सध्या लॉकडाऊन लावला आहे. विशेष म्हणजे चीनचे 3 कोटी लोक मंगळवारी लॉकडाऊनमध्ये होते. वाढत्या विषाणुच्या कारणामुळे अनेक ठिकाणी लोकांची चाचणी देखील करण्यात येत आहे. अचानक झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असल्याने चीनमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चीनमध्ये मंगळवारी 5,280 नवीन कोविडची प्रकरणे नोंदवली गेली, जी आदल्या दिवशीच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. चीनमध्ये ओमीक्रॉन विषाणु सगळ्या देशात पसरला असल्याचं म्हटलं जातंय. चीनमध्ये दोनवर्षासारखी परिस्थिती पुन्हा होऊ नये, यासाठी सरकारकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

13 शहर पुर्णपणे बंद

अचानक कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने चीनने 13 शहर पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. तसेच चीनच्या इतर शहरात देशील विपुल प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, जिलिनचा ईशान्य प्रांत सर्वात जास्त प्रभावित झाला असून मंगळवारी 3,000 हून अधिक नवीन प्रकरण उघडकीस आली आहेत. राजधानी चांगचुनसह नऊ दशलक्ष लोकांना घरीच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. शेन्झेन शहरात 17.5 दशलक्ष लोक आहेत. तिथले अनेक कारखाने बंद आणि सुपरमार्केटमध्ये तीन दिवस लॉकडाऊन आहे, तर चीनचे सर्वात मोठे शहर शांघाय शहरात कमी निर्बंध लादण्यात आले आहेत. 2019 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा उदयास आलेल्या साथीच्या रोगाने चीनवरती आक्रमण केले त्यानंतर कोरोना संपुर्ण जगात पसरला. अनेक देशांमध्ये कोरोनाचं प्रमाण सध्या कमी असताना मात्र चीनमध्ये पुन्हा डोकेवर काढले आहे.

रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने खळबळ

चीनमध्ये अनेक ठिकाणी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने खळबळ व्यक्त केली जात आहे, रोज प्रकरण वाढत असल्याने चीन सरकार चिंतेत आहे. विषाणुचं प्रमाण वाढल्यानंतर विषाणु रोखण्यात यश येईल असा चीनच्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. लावलेल्या निर्बंधामुळे लोकांच्यात पुन्हा भीती निर्माण झाली आहे. बीजिंग आणि शांघाय विमानतळावरील डझनभर देशांतर्गत उड्डाणे मंगळवारी सकाळी रद्द करण्यात आली. चांगचुनच्या जिलिन शहरातील फोक्सवॅगन ग्रुप कारखान्यांमध्ये झालेल्या उद्रेकाने सोमवारी तीन साइट्स किमान तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिलिनच्या राज्यपालांनी सोमवारी रात्री आपत्कालीन बैठकीदरम्यान “एका आठवड्यात समुदाय शून्य-कोविड साध्य करण्यासाठी” सर्वतोपरी जाण्याचे वचन दिले आहे.

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ

VIDEO | विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी, रोज छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला धू-धू-धुतलं

Nashik | शेतकऱ्याने तब्बल 15 लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान…!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.