AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात वयस्कर मुलाचा 30 वर्षानंतर जन्म, चक्रावलात ना? विज्ञानाची ही क्रांती वाचून थक्कच व्हाल; नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील ओहायो येथे 30 वर्षांनंतर जगातील सर्वात वयस्कर बाळाचा जन्म झाला आहे. 1994 मध्ये या बाळाचा गर्भ गोठवण्यात आला होता, त्यातून आता थॅडियसचा जन्म झाला आहे.

जगातील सर्वात वयस्कर मुलाचा 30 वर्षानंतर जन्म, चक्रावलात ना? विज्ञानाची ही क्रांती वाचून थक्कच व्हाल; नेमकं प्रकरण काय?
IVF
| Updated on: Aug 02, 2025 | 5:33 PM
Share

गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय शास्त्रात मोठी प्रगती झाली आहे. आता याचेच एक उदाहरण समोर आले आहे. अमेरिकेतील ओहायो येथे 30 वर्षांनंतर जगातील सर्वात वयस्कर बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचे नाव थॅडियस डॅनियल पियर्स असे आहे. 1994 मध्ये या बाळाचा गर्भ गोठवण्यात आला होता, त्यातून आता थॅडियसचा जन्म झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यू यॉर्क पोस्टने याबाबत एक वृत्त दिले आहे. यानुसार ओहायो येथील लिंडसे (34) आणि टिम पियर्स (35) हे या बाळाचे पालक आहेत. 26 जुलै 2025 रोजी जन्मलेल्या या बाळाचा गर्भ 30 वर्षांपूर्वी एका आयव्हीएफ सेंटरमध्ये विकसित करण्यात आला होता. या बाळाचे पालक टिम आणि लिंडसे हे बाळाचा गर्भ गोठवण्यात आला होता, तेव्हा 3 किंवा 4 वर्षांचे असतील. तेव्हापासून नोव्हेंबर 2024 पर्यंत हा गर्भ गोठवलेला होता.

सर्वात जास्त कालावधीनंतर जन्मलेलं बाळ

थॅडियस हे बाळ आता सर्वाधिक काळानंतर जन्मलेले बाळ आहे. या बाळाची आई लिंडसेने सांगितले की, जेव्हा आम्हाला या गर्भाच्या वयाबद्दल सांगितले होते तेव्हा आम्हाला ते विचित्र वाटले होते. आम्हाला हे माहिती नव्हते की 30 वर्षांपूर्वीही गर्भ गोठवले जायचे. आम्ही विक्रम मोडण्यासाठी बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला नव्हता, आम्हाला फक्त एक मूल हवे होते. कारण आम्ही सात वर्षे गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होतो, मात्र मूल होत नसल्याने आम्हाला थॅडियसचा गर्भ देण्यात आला आहे.

बाळाची बहीण 30 वर्षांची महिला

थॅडियस या बाळाची बहीण 30 वर्षांची आहे. तसेच तिला 10 वर्षांची मुलगी आहे. 1994 मध्ये लिंडा आर्चार्ड आणि तिच्या माजी पतीच्या आयव्हीएफ उपचारादरम्यान थॅडियसचा गर्भ इतर तीन गर्भांसह तयार करण्यात आला होता. यातील एक गर्भ लिंडामध्ये प्रत्यारोपित करण्यात आला होता, त्यानंतर तिने नऊ महिन्यांनंतर या मुलीला जन्म दिला होता. ही मुलगी आता 30 वर्षांची आहे. याचाच अर्थ थॅडियसचा गर्भ न गोठवता तो प्रत्यारोपित केला असता तर आज थॅडियसही 30 वर्षांचा असता.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले...

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले..

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क.

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?.

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?.

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?

Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार.

Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार