AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचं महाविकास आघाडी सारखं काम नव्हे, ते एकमेकांचे चेहरेही पाहत नाहीत; मंत्री बावनकुळे यांचा हल्लाबोल

chandrashekhar bawankule News : मंत्री चंद्रखेखर बावनकुळे यांनी महायुतीवर मोठं भाष्य केलंय. त्यांनी महायुतीविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा केला आहे.

आमचं महाविकास आघाडी सारखं काम नव्हे, ते एकमेकांचे चेहरेही पाहत नाहीत; मंत्री बावनकुळे यांचा हल्लाबोल
| Updated on: Jul 17, 2026 | 10:57 AM
Share

महायुतीत अर्थखात्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे दिसून आलं. त्यामुळे अर्थखाते कुणाच्या पारड्यात पडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु या घडामोडीवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी महायुतीमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. महायुतीविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘ राज्यात सर्व काही चांगलं सुरू असताना महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत’. बावनकुळे पुढे म्हणाले, ‘सकारात्मक भूमिका घेतल्यास राज्यात पक्ष वाढू शकतो. सकारात्मक भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात यश मिळू शकते. नकारात्मक भूमिका घेतल्यास महाराष्ट्र साथ देत नाही, हे विरोधी पक्षांना कळलं नाही, हे दुर्दैव आहे’.

‘ठाकरेंना आंदोलन करण्याचा अधिकार आहे . मागच्या काळात प्रभू रामांच्या भक्ताबद्दल काही भूमिका आणि वक्तव्य केलं, हे त्यांनी चेक करावं. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात काय-काय झालं, हे तपासून घ्यावं. जेव्हा भगवे फडकवण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे झेंडे फडकले. जेव्हा भगवान रामचंद्राची गजर करण्याची वेळ आली, तेव्हा मतांचं लांगुनचालून केलं. या नेत्यांच्या पाच वर्षांत भूमिका कशा बदलल्या, हे पाहावे. आता मताची व्होट बँक गेली. मुख्यमंत्री असताना भूमिका वेगळी, सत्ता असताना भूमिका वेगळी. सत्ता गेल्यावर भूमिका वेगळी. महाराष्ट्र हे कधीच सहन करत नाही. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारणाचा अड्डा करण्याचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे पुढे म्हणाले.   राज्य सरकारची साडी वाटपाची योजना बंद करण्यात आली आहे. त्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ‘एखाद्या वर्षी काही कारणामुळे बंद असतील. सुरू करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे पुन्हा निर्णय घेतील’.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ