सर्वात मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घरावर हल्ला, संपूर्ण जग हादरलं…
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी युक्रेनने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या सरकारी निवासस्थानावर ड्रोन डागण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप केल्याने जगात खळबळ उडाली आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्ध आणखीन भडकण्याची चिन्हे आहेत.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनने थेट रशियांचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारी निवास स्थानालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने आता हे युद्ध आणखी कोणत्या वळणावर जाणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी दावा केला आहे की युक्रेनने रशियाच्या नोवगोरोड प्रांतात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारी निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. लावरोव यांनी या हल्ल्याची संभावना स्टेट टेरेरिझम अशी केली आहे. त्यांनी याचा परिणाम शांतता करारावर होईल असे म्हटले आहे. लावरोव यांच्या मते २८ आणि २९ डिसेंबर दरम्यान युक्रेनने पुतिन यांच्या घरावर लांबपल्ल्याचे 91 ड्रोन डागले.परंतू या संदर्भातील पुरावे मात्र सादर करण्यात आलेले नाहीत.
लावरोव यांनी सांगितले की हा हल्ला संभावित शांतता कराराची चर्चा सुरु असताना झाला आहे. त्यांनी सांगितले की रशिया या परिषदेत सामील होईल, परंतू आपल्या स्थितीचे पुन्हा मुल्यांकन करेल. तसेच युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाच्या या आरोपांना फेटाळल ते खोटे असल्याचे म्हटले आहे. झेलेंस्की यांनी म्हटले आहे की अशा प्रकारे आरोप लावून सरकारी इमारतींवर हल्ल्याची तयारी केली जात आहे. आता सर्वांना सतर्क रहाण्याची गरज आहे.
रशिया उत्तर देणार
हा हल्ल्याची वेळ स्पष्ट झालेली नाही. यावेळी पुतिन निवासस्थानी उपस्थित होते की नव्हते हे स्पष्ट झालेले नाही. लावरोव यांनी म्हटले आहे की या हल्ल्याचे रशिया उत्तर देणार आणि कोणतीही कारवाई उशीर न लावता केली जाईल. त्यांनी सांगितले की रशियानी आधी जबाबी हल्ल्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहेत. तर दुसरीकडे झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे अपिल केले आहे की त्याने रशियाच्या धमक्यांनुसार पावले उचलावीत आणि शांतता करार कमजोर होऊ नये याची काळजी घ्यावी. झेलेंस्की यांनी भीती व्यक्त केली आहे की यु्क्रेनची राजधानी कीव्ह वर हल्ला होऊ शकतो.कारण पुतिन यांनी उचित टार्गेट हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
पुतिन यांची आर्मीसोबत बैठक
पुतिन यांनी सोमवारी रशियन सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी सांगितले की त्यांचे सैन्य २०२२ मध्ये ताब्यात घेतलेल्या युक्रेनी क्षेत्रावर आपले नियंत्र वाढवत आहे. ते म्हणाले की डोनबास, खेरसॉन आणि जपोरिजिया येथील सैन्य पुढे जात आहे. जपोरिजियाचा सुमारे तीन चतुर्थांशी भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. २०२२ मध्ये रशियाने डोनेट्स्क, खेरसॉन, लुहान्स्क आणि जपोरिजिया वर कब्जा केला होता. हा युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा जबरदस्तीचा क्षेत्रीय ताबा म्हटला जातो. तेव्हा युक्रेन नाटोकडे विनंती केली होती की त्याला संघटनचे लवकरात लवकर सदस्यत्व द्यावे. परंतू तसे होऊ शकले नाही.
