असं एक गाव मुलींचं लग्नच होत नाही, 800 मुली अविवाहित, गावात पाय ठेवताच नवरदेव पळून जातो
या गावामध्ये मुलींचं लग्नच जमत नाही, उपलब्ध माहितीनुसार या गावात तब्बल 800 मुली अविवाहित आहेत, यातील अनेकजणी लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र त्यांना नवरदेवच भेटत नाहीये.

धर्म कोणताही असो, लग्नाला एक पवित्र बंधन मानलं जातं. लग्नामुळे व्यक्तीला एक हक्काचा जोडीदार मिळतो. जो आयुष्यभर त्याला सांभाळून घेईल, त्याच्या सुख दु:खात सहभागी होईल. लग्नामुळे व्यक्तीवर एक जबाबदारी येते आणि त्यामुळे त्याचं आयुष्य स्थिर होतं. जगातील प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते की योग्य वयात आपल्या मुलाचं, मुलीचं लग्न झालं पाहिजे. त्यांचं ते स्वप्न असतं.
मात्र आता जग बदलत आहे, त्यामुळे साहाजिकच लग्नाचं स्वरुप देखील बदलत आहे. ताण-तणाव प्रचंड वाढला आहे. जोडीदाराकडून एकमेंकांबद्दल अपेक्षा देखील वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
एकीकडे सध्या अशी अवस्था आहे की, मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे लग्नाला लवकर मुलगी भेटत नाही. आजही अनेक जण वयाची पसत्तीशी उलटली तरी देखील अविवाहीत आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापुरात तर मुलगी भेटत नाही म्हणून लग्नासाठी इच्छूक असलेल्या तरुणांनी मोर्चा काढला होता.
मात्र असंही एक गाव आहे, जिथे मुलांच्या नाही तर मुलींचा विवाह हा मोठा प्रश्न बनला आहे. या गावात लग्नच होत नाही. या गावात तब्बल 800 अविवाहित मुली आहेत. त्यातीत अनेक जणींना लग्न करायचं आहे, मात्र त्यांना लग्नासाठी वर मिळत नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे, कोणतं आहे ते गाव आणि विवाह न होण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.
हे गाव ब्राझिलमध्ये आहे. या गावाचं नाव रोवाडोकॉर्डी असं आहे. या गावात तब्बल 800 मुली अविवाहीत आहेत. या मुलींना लग्नासाठी वरच मिळत नाहीये, याचं मुख्य कारण म्हणजे या गावात कुटुंबामध्ये स्त्रीचं वर्चस्व आहे. प्रत्येक कुटुंबाचा कारभार इथे महिलाच पाहातात, महिला जसं सांगतील तसं इथले पुरुष ऐकतात. त्यामुळे साहाजिकच या मुलींची देखील हीच इच्छा आहे की आपला होणारा पती देखील असाच असावा, तसेच या मुलींची गाव सोडण्याची तयारी नाहीये, त्यांना आपल्याच गावात राहायचं आहे. त्यामुळे या मुलींची ही अट ऐकून एकही नवरदेव लग्नासाठी तयार होत नाही.
