AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mosque Blast:अफगाणिस्तानात पुन्हा एका मशिदीवर हल्ला, 50 लोकांचा मृत्यू, 90 हून अधिक जखमी

Blast in Afghanistan Kunduz City : कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, 35 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Mosque Blast:अफगाणिस्तानात पुन्हा एका मशिदीवर हल्ला, 50 लोकांचा मृत्यू, 90 हून अधिक जखमी
अफगाणिस्तानात मशिदीवर बॉम्बहल्ला, 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 6:20 PM
Share

काबूल: अफगाणिस्तानात पुन्हा एकदा मशिदीला (Blast in Mosque) लक्ष्य करून त्यावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यात किमान 50 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. AFP या वृत्तसंस्थेला तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कुंदुज शहरात (Attack on Kunduz Mosque) शुक्रवारच्या नमाजानंतर शिया मशिदीवर हल्ला करण्यात आला आहे. साक्षीदारांनी सांगितले की, जेव्हा ते प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ( Afghanistan kunduz city bomb blast target shiite mosque several people injured dozens of casualties)

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुहाजिद म्हणाले, “आज दुपारी राजधानी कुंदुजच्या बंदर खान आबाद जिल्ह्यातील आमच्या शिया बांधवांच्या मशिदीत स्फोट झाला आहे, परिणामी आमचे अनेक नागरिक शहीद झाले आणि जखमी झाले.” या हल्ल्यात अनेक लोकांचा बळी गेला. प्रांताची राजधानी कुंडुजमधील लोकांनी AFPला सांगितले की, शुक्रवारी नमाज दरम्यान शिया मशिदीत स्फोट झाला. (Afghanistan Latest Bomb Blast)

रक्ताने माखलेले अनेक मृतदेह जमिनीवर

सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक फोटोमध्ये रक्ताने माखलेले अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसतात. दुसर्‍या व्हिडिओमध्ये महिला आणि मुलांला काही पुरुष घटनास्थळापासून दूर घेऊन जाताना दिसत आहेत. आम्ही हे फोटो आणि व्हिडिओंबद्दल अधिकृतपणे सांगू शकत नाही.मात्र एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मदत गटाचा एक कर्मचारीही जखमींमध्ये आहे. कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, 35 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. “डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स”द्वारे या स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणखी एका रुग्णालयाने सांगितले की. त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.

काबूलमध्येही मशिदीवर हल्ला झाला

याआधी 5 दिवसांपूर्वी काबूलमधील एका मशिदीच्या गेटवर जीवघेणा बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस-के म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने (ISIS-K Attacks) घेतली आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेना आयसीसची अफगाणिस्तान शाखा आहे. तालिबानला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहित यांच्या आईचा काहिच दिवसांपूर्वी मृत्यू झाला, त्यामुळे इथं शोकसभा आयोजत करण्यात आली होती. आयसीस-केच्या दहशतवाद्यांनी याच शोकसभेला लक्ष्य केलं.

हेही वाचा:

Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मशिदीसमोर बॉम्बस्फोट आणि गोळीबार, अनेकांचा मृत्यू

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.