Afghanistan Crisis | आधीही वाईट काळात साथ दिली, आताही साथ देणार, भारताचा अफगाणी नागरिकांसाठी पुढाकार

अफगाणिस्तानात तालिबानच्या ( Afghanistan Taliban ) राज्यात जी परिस्थिती बिघडली आहे, त्यातून अफगाणिस्तानच्या नागरिकांना ( Afghan Citizens ) मदत देण्याची तयारी भारताने ( India ) दाखवली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ( United Nations ) मदत पुरवण्याच्या प्रस्तावाचं भारताने समर्थन केलं आहे.

Afghanistan Crisis | आधीही वाईट काळात साथ दिली, आताही साथ देणार, भारताचा अफगाणी नागरिकांसाठी पुढाकार
S JAISHANKAR

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानच्या ( Afghanistan Taliban ) राज्यात जी परिस्थिती बिघडली आहे, त्यातून अफगाणिस्तानच्या नागरिकांना ( Afghan Citizens ) मदत देण्याची तयारी भारताने ( India ) दाखवली आहे. संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) मदत पुरवण्याच्या प्रस्तावाचं भारताने समर्थन केलं आहे. द हिंदू या वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुन्हा मदतीचा हात दिला आहे.

परराष्ट्र मंत्री अफगाणिस्तानबद्दल काय म्हणाले?  

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. याआधीही अफगाणिस्तानला भारताने मदत केलीय, आणि आता ज्याप्रकारे अफगाणिस्तानात गंभीर परिस्थिती तयार झाली आहे, या गंभीर काळात भारत अफगाणी नागरिकांना मदत करण्यास इच्छुक आहे असं जयशंकर यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गिटेरेस यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत अफगाणिस्तानच्या प्रस्तावावर जयशंकर बोलत होते.

भारत अफगणिस्तानला आर्थिक मदत पुरवणार का?

दरम्यान, भारताने अफगाणी नागरिकांच्या मदतीसाठी हात दिला असला तरी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत तालिबानला पुरवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. संयुक्त राष्ट्राने तालिबान सरकारने गैरकृत्य केल्यास, कडक पावलं उचलावी आणि तालिबानवर आंतरराष्ट्रीय दबाव राहू द्यावा यासाठी भारताने पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे.

भारताची अफगाणिस्तानात हजारो कोटींची गुंतवणूक

तालिबान सरकार येण्याआधीच भारताने अफगाणिस्तानात हजारो कोटींची गुंतवणूक करुन ठेवली आहे. अफगाणिस्तानातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं चाभार बंदर भारताने विकसित केलं आहे. हेच नाही तर अफगाणिस्तानातील नद्यांवर धरणं उभी केली आहेत. तिथं सिंचनासाठी सोयी केल्या आहेत. मात्र तालिबान सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर ही सगळी गुंतवणूक धोक्यात आली आहे. त्यामुळे तालिबानी सरकारशी भारताचं नातं कसं राहतं, त्यावर या गुंतवणूकीचं भविष्य अवलंबून असणार आहे.

चीनची तालिबानी सरकारला मान्यता का?

भारताने सध्या तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली नाही. मात्र दुसरीकडे चीनने आधीच तालिबानी सरकारला मान्यता दिली आहे. बेल्ट एंड रोड इनिशेटीव्ह या चीनच्या प्रकल्पाचा विस्तार काबूलपर्यंत करण्याचा मानस चीनचा आहे. त्यामुळेच चीन आता तालिबानशी जवळीक करताना दिसतो आहे. तिकडे पाकिस्तान तर अफगाणिस्तानातील सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतही सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान तालिबानशी जवळीक करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

इसिसचे दहशतवादी रशियात घुसखोरी करणार? पुतीन यांनी पाठवली 30 रणगाड्यांची कुमक, कधीही युद्धाची ठिणगी

आधी तालिबान्यांना फूस, आता काळ्या यादीत नाव न येण्यासाठी खटाटोप, पाकिस्तानचं लॉबिंग सुरु

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI