आधी तालिबान्यांना फूस, आता काळ्या यादीत नाव न येण्यासाठी खटाटोप, पाकिस्तानचं लॉबिंग सुरु

काबूलपासून वॉशिंग्टनपर्यंत पाकिस्तानविरुद्ध राग व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकवर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरत आहे. पाकिस्तानलाही या जागतिक परिस्थितीची चिंता आहे. त्यामुळे खरंच निर्बंध लागतील का या भीतीनं पाकनं लॉबिंगही सुरु केली आहे.

आधी तालिबान्यांना फूस, आता काळ्या यादीत नाव न येण्यासाठी खटाटोप, पाकिस्तानचं लॉबिंग सुरु
pakistan imran khan

मुंबई : काबूलपासून वॉशिंग्टनपर्यंत पाकिस्तानविरुद्ध राग व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकवर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरत आहे. पाकिस्तानलाही या जागतिक परिस्थितीची चिंता आहे. त्यामुळे खरंच निर्बंध लागतील का या भीतीनं पाकनं लॉबिंगही सुरु केली आहे. चीनसह अनेक देशांच्या गुप्तचर विभागासमोबत पाकिस्तानच्या बैठका सुरु आहेत. अमेरिकेविरुद्ध आघाडीचा करण्याचा पाकचा डाव आहे. (pakistan initially supported taliban government of afghanistan now fearing FATF blacklist)

पाकच्या ISI प्रमुखानं सुरक्षा मुद्यावर बैठक बोलावली

शनिवारी पाकच्या ISI प्रमुखानं सुरक्षा मुद्यावर बैठक बोलावली होती. बैठकीत रशिया आणि चीनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखसुद्धा सहभागी होते. इस्लामाबादमधल्या या बैठकीत इराण, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तानचे गुप्तचर प्रमुखांचीही बैठकीला हजेरी होती. रशिया, इराणचे पाकिस्तानसोबत घनिष्ट संबंध नाहीत. मात्र, हे देशसुद्धा या बैठकीला हजर होते. तालिबानने अफगाणीस्तानमध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे. पण त्या सरकारला अधिकाधिक देशांची मान्यता मिळवून देणं आणि अफगाणिस्तानचा गाडा हाकणं या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी पाकिस्तान हालचाली करत आहे.

16 सप्टेंबर रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या प्रमुखांचीही बैठक

येत्या 16 सप्टेंबर रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि जिनपिंग या SCO च्या बैठकीत भाग घेणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही SCO च्या बैठकीत भाग घेत आहेत. ही शांघायची बैठक ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये होणार आहे. पण पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या हवाईदलाची उपस्थिती बघून ताजिकिस्तानला राग आलेला आहे. शांघाय सहकार्य बैठकीपूर्वीच ताजिकिस्ताननं पाकिस्तानविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे. दुशांबेमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य बैठकीत पाकिस्तानला बोलवू नये यासाठी ताजिकिस्तानमध्ये निदर्शनंसुद्धा झाली आहेत. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत सापडलेला आहे. तसेच ताजिकिस्तानात होत असलेल्या या विरोधाचा जगभर प्रभाव पडेल आणि अमेरिका निर्बंधासाठी पुढाकार घेईल अशी पाकिस्तानला भीती पाकिस्तानला वाटत आहे.

पाकनं अफगाणिस्तानसाठी आर्थिक घोषणाही जाहीर केल्या

असे असले तरी पाकिस्तान मात्र बेपर्वा आहे. त्यांची नजर सध्या अफगाणिस्तानातल्या अर्थव्यवस्थेवर आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण हवंय. पाकनं अफगाणिस्तानसाठी आपल्या आर्थिक घोषणाही जाहीर केल्या आहेत. तालिबान्यांसोबत पाकिस्तानच्या रुपया चलनात व्यवहार करण्याचा निर्णय पाकनं घेतला आहे. याचाच अर्थ तालिबान आणि पाकिस्तानमध्ये होणारे करार डॉलर नाही तर पाकच्या रुपयामध्ये होणार आहेत. अफगाणिस्तानला पिळून काढण्यासाठी पाकिस्ताननं अशी अनेक कट-कारस्थानं रचली आहेत.

अमेरिकेनं पाकिस्तानचा फंड रोखला होता

दरम्यान, पुढच्या महिन्यात पाकिस्तानला FATF च्या बैठकीचा सामना करायचा आहे. FATF च्या बैठकीत पुन्हा एकदा काळ्या यादीत नाव येऊ नये साठी पाकचा खटाटोप सुरु आहे. तर दुसरीकडे यापूर्वी हक्कानी नेटवर्कवर कारवाई केली नाही म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानचा फंड रोखला होता. आता तर पाकनं आपल्या हट्टानं हक्कानी नेटवर्कला तालिबानी सरकारमध्ये सहभागी करुन घेतलं आहे. अल कायदाला नियंत्रणात ठेवू अशी दिशाभूल करुन अमेरिकेला गुंडाळू असं पाकला वाटतंय. पण अमेरिकेतलेही अनेक खासदार पाकवर निर्बंध टाका अशी मागणी करत आहेत. त्यामुळं पाकवर मर्जी बहाल करणं आता बायडेन यांनाही सोपं नाही.

इतर बातम्या :

योगींनी ‘अब्बाजान’ काढले, काँग्रेस म्हणते, लाज नाही वाटत?, ट्विटरवर ‘अब्बाजान’ फोटोंचा पूर, वाचा सविस्तर

UP Assembly Election : उत्तर प्रदेशात काँग्रेस प्रियंका गांधींच्या नेतृत्वात लढणार, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही त्याच ठरवणार!

कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून तरुणांना 4000 रुपयांची मदत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

(pakistan initially supported taliban government of afghanistan now fearing FATF blacklist)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI