AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगींनी ‘अब्बाजान’ काढले, काँग्रेस म्हणते, लाज नाही वाटत?, ट्विटरवर ‘अब्बाजान’ फोटोंचा पूर, वाचा सविस्तर

दुसरीकडे ट्विटरवर देशभर अब्बाजान ट्रेंड होतोय. अनेक जण स्वत:च्या वडीलांसोबतचे फोटो हमारे अब्बाजान म्हणत ट्विट करतायत. सोबत वडीलांची स्टोरीही आहे.

योगींनी 'अब्बाजान' काढले, काँग्रेस म्हणते, लाज नाही वाटत?, ट्विटरवर 'अब्बाजान' फोटोंचा पूर, वाचा सविस्तर
योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान म्हणत आधीच्या सरकारांवर टीका केलीय
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:11 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकांचा हंगाम जोर पकडताना दिसतोय. कारण हिंदू-मुस्लिम ध्रूवीकरणाला आता सुरुवात झालीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात राशनवर बोलता बोलता ‘अब्बाजान’ काढले आणि त्यावर काँग्रेसनं त्यांची ‘लाज’ काढलीय. दुसरीकडे ट्विटरवर देशभर अब्बाजान ट्रेंड होतोय. अनेक जण स्वत:च्या वडीलांसोबतचे फोटो हमारे अब्बाजान म्हणत ट्विट करतायत. सोबत वडीलांची स्टोरीही आहे. ह्या सगळ्या प्रकरणात धार्मिक वाद असला तरी अनेकांनी स्वत: ‘बापा’बद्दलच्या स्टोरीज शेअर केल्यात त्या मात्र भन्नाट आहेत.

योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले? काल म्हणजेच रविवारी कुशीनगरच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. राशनवर बोलता बोलता ते म्हणाले-2017 च्या आधी गरीबांना राशन मिळत नव्हतं. कारण त्यावेळेस अब्बाजान म्हणणारेच सगळं राश फस्त करुन टाकायचे. आता ह्या गरीबांचं राशन कुणी खाऊ शकत नाही आणि पचवूही शकत नाही. कुणी तसं केलं तर त्याला जेलची हवा खावी लागेल. योगी आदित्यनाथ एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेसला ‘आतंक की जननी’ म्हटलं. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर फक्त काँग्रेसच नाही तर सपाच्या अखिलेश यादव यांनीही टीका केली.

काँग्रेसचं उत्तर काँग्रेसला आतंकची जननी म्हटल्यानंतर ते थोडेच गप्प बसणार. काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ(Gaurabh Vallabh) यांनी योगी आदित्यनाथ यांची लाज काढली. ते म्हणाले-‘योगी आदित्यनाथ हे घाणेरड्या मानसिकतेचे (घटीया) व्यक्ती आहेत. एवढच नाही तर ते मामुली(ओछी) आहेत. त्यांच्याएवढ्या लहान मानसिकतेचा नेता दुसरी कुणी राजकारणात नाही. मला हे बोलताना वाईट वाटतं, पण योगी आदित्यनाथ यांना हे सगळं बोलताना लाज नाही वाटली?’ आतंक की जननीला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता म्हणाला-आम्ही महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बेअंतसिंह, विद्याचरण शुक्ल यांना दहशतीमुळेच गमावलं. नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी होता. योगींनी सांगावं, मसुद अजहरला कुणी सोडलं? आसिया अंद्राबीला पोस्टर गर्ल कुणी बनवलं? याच मुद्दयाला पुढं जोडत त्यांनी पंतप्रधानांनाही टार्गेट केलं. गौरव वल्लभ म्हणाले- पंतप्रधानांनी सांगावं, तालिबानसोबत काय करार झालाय? ब्रिक्समध्ये पुतीननं तालिबानचा मुद्दा उचलला पण पंतप्रधान मोदी मात्र गप्प बसले.

ट्विटरवर ‘अब्बाजान’ अब्बाजानवर भाजप आणि काँग्रेसमध्ये अशी राजकीय हमरीतुमरी सुरु असतानाच ट्विटरवर अब्बाजान ट्रेंड होतोय. अनेकांनी स्वत:च्या वडीलांसोबतचे फोटो ट्विट करत हमारे अब्बाजान म्हणून स्टोरीज शेअर केल्यात. त्यात पत्रकारांचा भरणा बऱ्यापैकी आहे. राना सफावी लिहितात- #HamareAbbaJaan चे अब्बाजान. माझे दादा, ते IAS होते, स्वतंत्र भारताच्या पहिल्या बॅचचे. त्यांनी 1920 मध्ये उप जिल्हाधिकारी म्हणून सर्व्हिस ज्वाईन केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी IAS करण्यात आलं. खान बहादूर सय्यद मोहम्मद अब्बास झैदी. प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर हन्सल मेहता यांनीही वडीलांचा फोटो ट्विट करत, मी माझ्या अब्बाजानला मिस करतो असं लिहिलंय.

मराठा, ओबीसींच्या आरक्षणात भाजपचाच खोडा, 50 टक्क्यांची मर्यादा का वाढवली नाही? : अतुल लोंढे

Ola इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीत ‘महिला राज’, स्त्रियाच चालवणार कारखाना, 10,000 जणींची भरती होणार

‘बार्टी’च्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडणार नाही, बडोलेंच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा दावा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.