काबुलच्या गुरुद्वाऱ्यात तालिबान्यांचा धुडगूस, दुसऱ्यांदा घुसून झाडाझडती आणि धमकी, शिख समुदायाने भारताकडे केली ही मागणी!

स्थानिक शीख नागरिकांनी सांगितले की, शुक्रवारी शस्त्रास्त्रे असलेले तालिबानी गुरुद्वारामध्ये घुसले आणि शोधाशोध केली. हेच नाही तर लोकांना घाबरवलं.

काबुलच्या गुरुद्वाऱ्यात तालिबान्यांचा धुडगूस, दुसऱ्यांदा घुसून झाडाझडती आणि धमकी, शिख समुदायाने भारताकडे केली ही मागणी!
काबुलच्या गुरुद्वाऱ्यात तालिबान्यांचा धुडगूस (प्रातिनिधीक फोटो)

काबुलच्या गुरुद्वाऱ्यात दहशतीचं सावट आहे, कारण गेल्या 10 दिवसांत दुसऱ्यांदा तालिबानचे दहशतवादी गुरुद्वाऱ्यात घुसल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक शीख नागरिकांनी सांगितले की, शुक्रवारी शस्त्रास्त्रे असलेले तालिबानी गुरुद्वारामध्ये घुसले आणि शोधाशोध केली. हेच नाही तर लोकांना घाबरवलं. ही घटना काबूलच्या गुरुद्वारा दशमेश पिता श्री गुरु गोबिंद सिंह कार्टे परवन इथं घडली. यापूर्वीही तालिबानी दहशतवादी गुरुद्वारामध्ये घुसले होते. (Afghanistan: Taliban Fighter enterd in Kabul Karte Parwan Gurudwara Second time in 10 days)

स्थानिक शीख समुदायाच्या एका सदस्याने द इंडियन एक्सप्रेसला फोनवर सांगितले, “तालिबानी दहशतवादी गुरुद्वारामध्ये घुसले. त्यांनी गुरुद्वाऱ्यात शोधाशोध केली आणि आम्ही रायफल आणि शस्त्रे लपवत असल्याचा दावा केला. त्यांनी सध्याचे आमचे खासदार नरेंद्र सिंह खालसा यांच्या कार्यालयाचीही झडती घेतली. खालसा सध्या भारतात आलेले आहेत. तालिबानी म्हणाले की, ‘आमच्या गुरुद्वारा अध्यक्ष आणि समाजाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून इथं काय घडत आहे ते सांगितले. मशिदींमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये शेकडो शिया मुस्लिम मारले गेले आहेत, ज्यामुळे हिंदू आणि शीख भयभीत झाले आहेत. आम्हाला एवढंच हवे आहे की, आम्हाला लवकरात लवकर येथून बाहेर काढा. आम्हाला इथं मरायचं नाही.

गुरुद्वाऱ्याच्या रक्षकाल तालिबान्यांची धमकी

5 ऑक्टोबर रोजी सशस्त्र तालिबान्यांनी गुरुद्वाराच्या आत घुसून परिसर तोडफोड केली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, हेच नाही तर गुरुद्वाराच्या सुरक्षारक्षकांना धमकावलं. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मला काबूलमध्ये अडचणीत असलेल्या शीख समुदायाकडून फोन येत आहेत. आज दुपारी 2 च्या सुमारास अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या विशेष युनिटचे असल्याचा दावा करणारे सशस्त्र अधिकारी जबरदस्तीने काबूलमधील गुरुद्वारा दशमेश पिता कराटे परवनमध्ये घुसले. त्यांनी गुरुद्वारामध्ये उपस्थित असलेल्या समुदाय सदस्यांना धमकावले आणि पवित्र स्थळाचे पावित्र्य भंग केले.

खासदार नरिंदरसिंग खालसा यांच्या कार्यालयावर छापा

या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांनी केवळ गुरुद्वारावरच नव्हे तर गुरुद्वाराला लागून असलेल्या सामुदायिक शाळेच्या संपूर्ण परिसरातही छापा टाकला.” सुरुवातीला त्यांना खाजगी सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यापासून रोखले होते, परंतु त्याला गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली आणि मारहाणही करण्यात आली. त्यांनी गुरुद्वाराला लागून असलेल्या खासदार नरिंदर सिंह खालसा यांच्या कार्यालयावरही छापा टाकला. शीख समुदायाचे सुमारे 20 सदस्य गुरुद्वारामध्ये उपस्थित होते. अफगाणिस्तानमधील संपूर्ण शीख समुदाय आता घाबरत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुमारे 180 अफगाण शीख आणि हिंदू अजूनही उपस्थित आहेत.

हेही वाचा:

भारताच्या अंतरिम सरकारचे अर्थमंत्री, पाकचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांचा इतिहास नेमका काय?

रशियात पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू, स्पुतनिक लसीलाही नागरिकांचा नकार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI