AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Green Card Review : एका अफगाणी नागरिकाच्या चुकीची शिक्षा अमेरिकेत राहणाऱ्या 18 देशांच्या नागरिकांना भोगावी लागणार, यात भारत आहे का?

Green Card Review : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये व्हाइट हाऊस बाहेर गोळीबाराची घटना घडली. यात एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले आहेत. त्यांनी 'जो आपल्या फायद्याचा नाही, तसा एकही नागरिक अमेरिकेत राहणार नाही' असं स्पष्टपणे म्हटलय.

Green Card Review : एका अफगाणी नागरिकाच्या चुकीची शिक्षा अमेरिकेत राहणाऱ्या 18 देशांच्या नागरिकांना भोगावी लागणार, यात भारत आहे का?
Donald Trump
| Updated on: Nov 28, 2025 | 4:57 PM
Share

व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर अमेरिकी प्रशासन Action मोडमध्ये आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर अमेरिकी एजन्सी US मध्ये वास्तव्य करणाऱ्या अफगाणिस्तानसह 19 देशांच्या नागरिकांची चौकशी करणार आहे. या नागरिकांच्या वास्तव्यात काही चुकीच आढळल्यास त्यांना तात्काळ त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. ‘जो आपल्या फायद्याचा नाही, तसा एकही नागरिक अमेरिकेत राहणार नाही’ असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलय. व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. त्याचा आरोप अफगाणिस्तानचा नागरिक रहमुल्लाहवर आहे. या गोळीबारात अमेरिकेचा एक सैनिक शहीद झाला. एक जवान गंभीररित्या जखमी झाला.

राष्ट्रपती बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने 19 देश चिंताजनक होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचं सूतोवाच केलं होतं. या देशांच्या वीजावरही कारवाई झाली होती. अफगाणिस्तानचा नागरिक रहमुल्लाहने व्हाइट हाउसबाहेर गोळीबार केल्यानंतर या देशाच्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्या देशांच्या लोकांवर कारवाईची तयारी आहे, त्यात भारताचा शेजारी म्यानमार सुद्धा आहे. म्यानमारचा सुद्धा अमेरिकेने चिंताजनक देशांच्या यादीत समावेश केला आहे.

चिंताजनक देशांच्या यादीत कुठले-कुठले देश?

म्यानमार आणि अफगानिस्तान शिवाय चाड, कांगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, हैती, इराण, येमेन, लीबिया, सोमालिया, बुरुंडी, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि वेनेजुएला हे देश सुद्धा या यादीमध्ये आहेत. या 19 देशांच्या नागरिकांची ओळख पटवून त्यांना डिपोर्ट करण्याचे अमेरिकन सुरक्षा पथकाच्या जवानांना निर्देश दिले आहेत.

ग्रीन कार्ड कोणाला दिलं जातं?

न्यूजवीक मॅगजीननुसार, अमेरिकी प्रशासनाच्या या आदेशाचा थेट परिणाम 2 लाख 33 हजार लोकांवर होईल. यात बहुतांश अफगाणी आहेत. जे 2021 साली अफगाणिस्तानातून पळून अमेरिकेत गेले. अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेचे प्रमुख जोसेफ एडलो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ‘संयुक्त राज्य अमेरिकेच्या चिंताजनक देशांच्या यादीत येणार्‍या प्रत्येक परदेशी नागरिकाची कठोर चौकशी करण्यात येईल’ ग्रीन कार्ड शरणार्थींना दिलं जातं. बायडेन यांच्या प्रशासनात 5 लाख लोक शरणार्थी होते. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. ट्रम्प मेक अमेरिका, ग्रेट अमेरिका अभियानातंर्गत शरणार्थींना आपल्या देशातून हटवत आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.