Trump Greenland : ग्रीनलँडनंतर ट्रम्प यांची नजर भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या बेटावर, त्यासाठी अमेरिकेने हल्ला केल्सास त्यात भारताचाच मोठा फायदा
Trump Greenland : ग्रीनलँडनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर भारताच्या जवळच्या मित्र देशाच्या बेटावर आहे. ट्रम्प यांनी आपले इरादे जाहीर केले आहेत. उद्या अमेरिकेने आक्रमकता दाखवून हे बेट आपल्या ताब्यात ठेवल्यास त्यात भारताचाच मोठा फायदा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडवर कब्जा करायचा आहे. त्यांचं सैन्य कधी तिथे हल्ला करेल आणि तो भाग ताब्यात घेईल, हे कोणीही सांगू शकणार नाही. ग्रीनलँडचे लोक सुद्धा अलर्ट मोडवर आहेत. ग्रीनलँड बद्दलचा आपला इरादा ट्रम्प यांनी वेळोवेळी जाहीर केला आहे. तेच ट्रम्प यांनी आपल्या पुढच्या प्लानचा सुद्धा खुलासा केला आहे. ट्रम्प यांचं पुढचं टार्गेट डिएगो गार्सिया आहे. आमचा सहकारी युनायटेड किंगडम डिएगो गार्सिया हे बेट मॉरीशेसला देण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांना हे मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलय. UK ची डील मूर्खपणा असेलं असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होतं की, त्यांची नजर डिएगो गार्सिया बेटावर आहे. त्यांच्या विश लिस्टमध्ये हे बेट आहे. ऑक्टोंबर 2024 मध्ये UK सरकारने घोषणा केलेली की, रणनितीक दृष्टीने महत्वाच्या चागोस बेटांची जबाबदारी ते मॉरीशेसकडे सोपवतील. यूकेने याला ऐतिहासिक राजकीय करार म्हटलं. UK चं दीर्घकाळापासून चागोस आणि तिथे असलेल्या डिएगो गार्सिया मिलिट्री बेसवर कंट्रोल आहे. अमेरिकेसोबत मिळून यूके हे बेट ऑपरेट करतो.
या बेटाचा इतिहास काय?
चागोस द्वीपसमूहावर 58 बेटं आहेत. हिंदी महासागरात मालदीवच्या दक्षिणेला जवळपास 500 किमी अंतरावर ही बेटं स्थित आहेत. 18 व्या शतकाच्या अखेरपर्यंत या बेटावर कोणी नव्हतं. फ्रान्सचे लोक इथल्या नारळांच्या बागांमध्ये काम करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारतातून लोक घेऊन आले. 1814 मध्ये फ्रान्सने हे बेट इंग्रजांकडे सोपवलं. 1965 साली यूकेने ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी (BIOT) बनवली. यात चागोस बेट होतं. BIOT मधील काही दुसरी बेटं नंतर 1976 साली सेशेल्सला देण्यात आली. प्रशासकीय कामांसाठी चागोस मॉरीशेसला जोडण्यात आलं. हिंदी महासागरात ब्रिटनची आणखी एक कॉलनी होती. 1968 साली ब्रिटिशांकडून मॉरीशेसला स्वातंत्र्य मिळालं. पण चागोस बेट ब्रिटनने आपल्याकडेच ठेऊन घेतलं.
मॉरीशेसचा आरोप काय?
UK ने चागोस बेटं बेकायदरित्या आपल्या ताब्यात ठेवली आहेत, असा मॉरीशेसचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपाठीवर सुद्धा त्यांनी हा मुद्दा उचलला आहे. काही वर्षांपूर्वी चागोस बेटांच्या भविष्यासाठी UK आणि मॉरीशेस सरकारमध्ये बोलणी सुरु झाली. डिएगो गार्सिया वगळून यूकेने चागोस बेटांवरील आपला दावा सोडून दिलाय. मॉरीशेस अन्य बेटांवर आपला राज्य कारभार करण्यासाठी स्वतंत्र आहे.
भारताची भूमिका काय?
भारताने चागोस बेटांबाबत नेहमीच मॉरीशेसच्या दाव्यांच समर्थन केलं आहे. या डीलच स्वागत केलं आहे. भारताने 2019 साली UNGA मध्ये मॉरीशेसच्या बाजूने मतदान केलं होतं. हिंदी महासागरात चीनचं वाढत वर्चस्व लक्षात घेऊन अलीकडच्या वर्षात भारताने मॉरीशेस सोबतचे आपले संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.
अमेरिकेला हे बेट का हवं?
हिंदी महासागरातील चीनचं वाढचं वर्चस्व लक्षात घेता अमेरिकेने डिएगो गार्सिया बेटावर ताबा मिळवल्यास त्यात भारताचा फायदा होऊ शकतो. या मिलिट्री बेसवर अमेरिकेची अनेक अणवस्त्र असल्याचा काही रिपोर्ट्समधून दावा करण्यात आला होता. इथून अमेरिकेला जगात काहीही करण्याची ताकद मिळते. इथे कब्जा केल्यास हिंदी महासागरात अमेरिकेचा दबदबा आणखी वाढेल. चीनच्या लष्करी साम्राज्याला आव्हान देणं अमेरिकेसाठी सोपं आहे. त्यामुळे हे बेट अमेरिकेने आपल्या ताब्यात ठेवल्यास त्यात भारताचा फायदा आहेच.
