आता सौदी अरेबियावर हल्ल्याची भिती, तडकाफडकी THAAD एअर डिफेन्स सिस्टिम Active
आता सौदी अरेबियाने THAAD ही अमेरिकन एअर डिफेन्स प्रणाली सक्रीय केली आहे. सौदी अरेबियाने हल्ल्याची भिती असल्याने हे पाऊल उचललं आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने THAAD ही अमेरिकन एअर डिफेन्स प्रणाली सक्रीय केल्याची घोषणा केली आहे.

इराण-इस्रायल युद्धाची हवा आता अन्य आखाती देशांमध्ये पसरु लगाली आहे. कतरच्या एअरबेसवर झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाला भिती आहे की, त्यांच्यावरही असा मिसाइल हल्ला होऊ शकतो. म्हणून सौदी अरेबियाने अमेरिकी एअर डिफेन्स प्रणाली THAAD सक्रीय केली आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने स्वत: या बाबत पुष्टी केलीय. मिडिल ईस्टमध्ये इराण-इस्रायल दरम्यान 12 दिवसाच्या युद्धानंतर सीजफायर झालं. पण अन्य आखाती देशांच्या मनात या युद्धामुळे भिती निर्माण झालीय. कारण अमेरिका या युद्धात उतरली होती. इराणने कतरमधील अमेरिकी एअरबेसवर मिसाइल हल्ला करुन याचं उत्तर दिलं. सौदीने THAAD सिस्टिम एक्टिव करण्यामागे हेच कारण आहे. आखाती देशात कतर, कुवैत, जॉर्डन, बहरीन आणि सौदी अरेबियामध्ये अमेरिकी एअरबेस आहे. सौदीची इराणसोबत जुनी दुश्मनी आहे. त्यामुळे सौदीला हल्ल्याची भिती आहे.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने THAAD ही अमेरिकन एअर डिफेन्स प्रणाली सक्रीय केल्याची घोषणा केली आहे. मेहर समाचार एजन्सीनुसार, अमेरिका निर्मित टर्मिनल हाय एटीट्यूट एरिया डिफेंसची (THAAD) तैनाती छोट्या आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल्सना रोखण्यासाठी केली आहे. हे पाऊल उचलण्यामागे देशाची एअर डिफेन्स सिस्टिम अभेद्य बनवणं हा उद्देश असल्याच सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं. अमेरिकी मॅगझिन न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार इस्रायल सुद्धा THAAD प्रणाली वर अवलंबून आहे. इराण आणि येमेनकडून होणारे हल्ले थाड प्रणाीलद्वारे परतवता येतात.
भारताचा S-500 विकत घेण्याचा विचार
भारताकडे अशी S-400 एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ही एअर डिफेन्स सिस्टिम 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या टार्गेटचा वेध घेऊ शकते. याच प्रणालीने पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले विफल केले होते. पाकिस्तानी ड्रोन्स आणि बॅलेस्टिक मिसाइल्स हवेतच नष्ट केली होती. सर्व बाजूंनी भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी भारताला अजून एक S-400 एअर डिफेन्स सिस्टिम मिळणार आहे. भारतामध्ये आता S-500 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्याचा विचार सुरु आहे. या सिस्टिममध्ये हायपरसोनिक मिसाइल हल्ला रोखण्याची क्षमता आहे.
