AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War : अखेर या देशाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी गुड न्यूज, भारतासाठी सुद्धा चांगले संकेत

Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात टॅरिफ वॉर छेडलं आहे. या अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्यामध्ये अनेक देश पोळून निघत आहेत. भारतालाही याचा फटका बसला आहे. आता एका मोठ्या देशाने अमेरिकेला गुड न्यूज दिली आहे. त्यात भारतासाठी सुद्धा काही चांगले संकेत आहेत.

Tariff War : अखेर या देशाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी गुड न्यूज, भारतासाठी सुद्धा चांगले संकेत
donald trump & Mark Carney
| Updated on: Aug 23, 2025 | 8:29 AM
Share

सध्या जगात टॅरिफ वॉर सुरु आहे. याला जबाबदार आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी जगातील अनेक देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावला आहे. त्यामुळे अमेरिकेत तर महागाई वाढणारच आहे. पण सोबतच अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा याचा फटका बसतोय. यात भारत सुद्धा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, सध्या 25 टक्के टॅरिफ वसूल केला जात आहे. पुढच्या काही दिवसात रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून अजून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल. या टॅरिफ वॉर दरम्यान आता एक थोडी चांगली दिलासा देणारी बातमी आहे. म्हणा हा, दिलासा अमेरिकेला मिळणार आहे. पण यातून भविष्यासाठी थोडे चांगले संकेत आहेत.

कॅनडा येत्या 1 सप्टेंबरपासून बऱ्याच अमेरिकी वस्तुंवरील टॅरिफ हटवणार आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने हा टॅरिफ लावला होता. पण स्टील, एल्युमीनियम आणि ऑटोमोबाइल वस्तुंवरील टॅरिफ तसाच राहिलं. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यानंतर कार्नी यांनी प्रत्युत्तर म्हणून लावलेला टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोन्ही देशातील ट्रेड टेन्शन कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

USMCA काय आहे?

ही घोषणा USMCA (अमेरिका-मॅक्सिको-कॅनडा एग्रीमेंट) करारा अंतर्गत करण्यात आली आहे. USMCA अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सना सूट देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. USMCA 1 जुलै 2020 रोजी लागू झालेला. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या जागी (NAFTA) USMCA सुरु झालेला. या करारामागे अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडामधील आर्थिक संबंध मजबूत करणं आणि व्यापार संतुलन साधणं हा उद्देश होता.

टायमिंग महत्वाचा

कॅनडाने हा निर्णय घेण्यामागचा टायमिंगही खूप महत्वाचा आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये एका व्यापक ट्रेड डीलवर चर्चा सुरु असताना कॅनडाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने ऑगस्ट महिन्यात कॅनडावर 35 टक्के टॅरिफ लावला होता. प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने सुद्धा अमेरिकी सामानावर 25 टक्के टॅरिफ लावला. “आता अमेरिकी सामानावरील टॅरिफ मागे घेण्याच्या निर्णयामुळे वॉशिंग्टनसोबत व्यापार चर्चेला गती येईल” असं कार्नी म्हणाले.

ट्रम्प काय म्हणाले?

“सध्या कॅनडाचा अमेरिकेसोबत चांगला व्यापार करार आहे. अन्य कुठल्याही देशापेक्षा हा करार चांगला आहे” असं कार्नी म्हणाले. “कार्नी यांच्यासोबत सार्थक चर्चा झाली. आम्हाला कॅनडासोबत चांगला व्यवहार करायचा आहे” असं ट्रम्प म्हणाले. ‘मला कार्नी आवडतात. मला वाटत ते एक चांगले व्यक्ती आहेत’ अशा शब्दात ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केलं.

भारतासाठी चांगले संकेत काय?

टॅरिफ हटवण्याचा हा निर्णय कॅनडाचे अन्य राजकीय नेते आणि युनियन नेत्यांना पटलेला नाही. त्यांनी कार्नी यांच्यावर टीका केली. कॅनडाने घेतलेला हा निर्णय भारतासाठी चांगला संकेत यासाठी आहे, कारण भविष्यात भारत-अमेरिकेमध्ये सुद्धा चर्चा होऊन 50 टक्के टॅरिफच्या वादात तोडगा निघू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.