AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka crisis: पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचे घर जाळले, राष्ट्रपती राजपक्षे पळाले, 13 जुलैला देणार राजीनामा

रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत ६ पत्रकारांसह ६४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुपारी राष्ट्रपती निवासावर आंदोलनकर्त्यांनी कब्जा केला.

Sri Lanka crisis: पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचे घर जाळले, राष्ट्रपती राजपक्षे पळाले, 13 जुलैला देणार राजीनामा
श्रीलंकते उद्रेक, पंतप्रधानांचे राजीनाम्यानंतर घर जाळले Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 11:21 PM
Share

कोलंबो- आर्थिक संकटानंतर सामान्य श्रीलंकन नागरिकांचे सरकारविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. राष्ट्रपती भवनावर (Rashtrpati Bhavan) चालून गेलेल्या आंदोलकांनी, आता पंतप्रधान विक्रमसिंघे (PM Vikramsinghe)यांचे घर जाळले (house set on fire)आहे. रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 6 पत्रकारांसह 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुपारी राष्ट्रपती निवासावर आंदोलनकर्त्यांनी कब्जा केला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी पलायन केल्याची माहिती आहे. ते सध्या कुठे आहेत, याची माहिती कुणाकडेच नाही. ते श्रीलंकेत आहेत की बाहेरच्या देशात गेलेत हेही माहीत नाही. 13 जुलैला ते राजीनामा देणार अशी माहिती आहे.

पंतप्रधानांचा राजीनामा

दुपारी राष्ट्रपती भवनावर आंदोलकांच्या कब्ज्यानंतर पंतप्रधानावंर दबाव वाढला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. राजीनाम्यापूर्वी त्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. त्यात संसदेच्या सभापतींना अंतरिम राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव ठेवला. श्रीलंकेच्या घटनेनुसार राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिना लोकसभा सभापती अंतरिम राष्ट्रपती म्हणून पद सांभाळू शकतात. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी संध्याकाळी त्यांच्या घरावर हल्ला करत, त्यांचे घर जाळून टाकले आहे.

राजपक्षे कुटुंबीयांविरोधात जनतेचा उद्रेक

शनिवारी आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनावरच मोर्चा वळवला. त्यामुळे राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली. यापूर्वी मे महिन्यातही नागरिकांच्या उद्रेकात राजपक्षे यांचे लहान भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यावेळी राजपक्षे कुटुंबीयांनी पळ काढत नेव्हल छावणीत आसरा घेतला होता. राजपक्षे कुटुंबीयांमुळेच देशावर ही वेळ आल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. राजपक्षे परिवाराने 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे.

राष्ट्रपती भवनात आंदोलकांचा धुडगूस

राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी तिथे धुडगूस घातला. राष्ट्रपती भवनातील शाही स्विमिंगपूलमध्ये अनेक जण उतरले. राष्ट्रपती निवासस्थानातील किचनमध्ये गर्दीने अनेक पदार्थांवर तावमारला. तसेच राष्ट्रपती भवनातील खोल्यांमध्येही हे आंदोलक शिरले आणि त्यांनी तिथे आरामही केला.

पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.