डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच पाकिस्तानला धडा शिकवणार भारत, मोठा गेम, थेट इशारा
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे. मात्र, भारताने रशियासोबतचा करार रद्द केला नसून अजून व्यापार वाढवण्यावर प्रयत्न केली जात आहेत. भारताकडून अमेरिकेच्या कोणत्याही टॅरिफबद्दलच्या अटी मान्य करण्यात नाही आल्या.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाच्या दाैऱ्यावर आहेत. अमेरिका आणि भारतामध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून तणाव असताना या दाैऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालंय. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्यानेच अमेरिकेने त्यांच्यावर टॅरिफ लावला असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेच्या विरोधात भारत आणि रशिया एकत्र येऊन लढत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान एस. जयशंकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की, भारत आणि रशिया कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतात. यासोबतच दहशतवादाला एकत्रितपणे प्रत्युत्तर देखील दिले जाईल. दोन्ही देशाचे नाते अनेक वर्षांपासून मजबूत असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे. मात्र, भारताने रशियासोबतचा करार रद्द केला नसून अजून व्यापार वाढवण्यावर प्रयत्न केली जात आहेत. भारत-रशिया व्यापार संतुलित आणि शाश्वत असणे आवश्यक आहे. त्यांनी नॉन-टॅरिफ अडथळे आणि काबी अडथळे दूर करण्यावर भर दिला असल्याचे एक जयशंकर यांनी म्हटले. या बैठकीमध्ये काही महत्वाच्या गोष्टींवर देखील चर्चा झाली आहे.
भारताकडून हे स्पष्ट करण्यात आले की, कृषी, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे केवळ व्यापार असमतोलच सुधारणार नाही तर दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधही मजबूत होतील. थोडक्यात काय तर या बैठकीत फक्त व्यापार नाही तर दहशतवादावरही भाष्य करण्यात आले आणि स्पष्ट केले की, दहशतवादावर भारत आणि रशिया एकत्र लढणार आहे.
भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने मोठ्या हल्ल्याची धमकी भारताला दिली. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारतावर दबाव टाकण्यासाठी ही मोठी रणनीती आखण्यात आली होती. मात्र, भारताने अमेरिकेला भीक घातली नाही. या सर्व घडामोडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट जपानच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दाैऱ्याची घोषणा झाली असून काही महत्वाचे करार देखील यादरम्यान केली जाणार आहेत. भारताकडून अमेरिकेला मोठा झटका दिला जात आहे.
