AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा अमेरिकेला दुसरा सर्वात मोठा धक्का, टॅरिफच्या तणावात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट…

टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नात असतानाच मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे.

भारताचा अमेरिकेला दुसरा सर्वात मोठा धक्का, टॅरिफच्या तणावात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट...
| Updated on: Aug 21, 2025 | 2:54 PM
Share

भारत आणि अमेरिकेत सध्या तणाव सुरू असून अनेक देश हे भारताच्या समर्थनार्थ मैदानात आली. भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या अटी मान्य केल्या नसल्यातरीही या अटी मान्य करण्यासाठी भारतावर मोठा दबाव आहे. आता अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान जपान दौऱ्यावर जात आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा हा दाैरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. टॅरिफमुळे भारताला फटका बसत आहे. हेच नाही तर याचा थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.

या संकटाच्या काळात जपानने भारताला उघडपणे पाठिंबा दिला. जपानने म्हटले आहे की, ते पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान $68 अब्ज खाजगी गुंतवणुकीचे वचन देणार आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल. फक्त जपानच नाही तर या वाईट काळात भारतासोबत रशिया देखील उभा आहे. रशियाच्या बाजारपेठेत त्यांनी भारतीय वस्तूंची स्वागत करणार असल्याचे सांगत आयात वाढवणार असल्याचेही म्हटले.

जपानी माध्यमांच्या रिपोर्टनुसार, जपानकडून भारतात 68 अब्ज डॉलर्सची किंवा 10 ट्रिलियन येनची  गुंतवणूक केली जाणार आहे. जपान आणि भारत दोघेही इंडो पॅसिफिक प्रदेश खुला करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. जपानी सरकारच्या सूत्रांच्या रिपोर्टनुसार, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकी अगोदर चर्चा होईल आणि त्यानंतर नेमक्या गुंतवणूकीचा स्पष्ट आकडा हा पुढे येईल.

दोन्ही देशांकडून ही गुंतवणूक आणि पुढे धोरण ठरवली जाणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्य मदतीला येताना दिसत आहेत. अमेरिका भारताला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. या काळात भारताचे मित्र देश हे मदतीला धावून येत आहेत. जपानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय घोषणा करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. नरेंद्र मोदी यांचा जपानचा दाैरा जाहीर झाल्यानंतर अमेरिकेला धक्का बसला आहे. भारत अमेरिकेच्या विरोधात रणनीती आखताना आता दिसत आहे. 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आला आहे.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.