तब्बल 188 कोटी कमावण्याची संधी… अमेरिकेचे नागरिकत्वही मिळणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी ऑफर, करावे लागणार हे काम
Donald Trump 188 Crore Rewards: मध्यावधी निवडणुकीत मोठा झटका बसल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी ऑफर आणली आहे. जो योग्य, अचूक आणि विश्वसनीय माहिती देईल, त्या व्यक्तीला 188 कोटी कमावण्याची संधी मिळणार आहे.

Iran Nuclear Program Information: इराणच्या गुप्त अणू कार्यक्रमाविषयी अचूक, योग्य आणि विश्वसनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीला तब्बल 188 कोटी कमावण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि सेंट्रल कमांडने (CENTCOM) ही माहिती गोळा करण्याची मोहिम हाती घेतली आहे. अमेरिकेच्या रिवॉर्ड्स फॉर जस्टिस या विशेष कार्यक्रमातंर्गत इराणच्या अणू, अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला 20 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेत आश्रय देण्यात येणार आहे. त्याच्या सुरक्षेची तयहयात काळजीही घेण्यात येणार आहे.
कोणती माहिती द्यावी लागणार?
अमेरिकेच्या लष्काराने आणि प्रशासनाने याविषयीची माहिती दिली आहे. बक्षीस मिळवण्यासाठी इराणच्या अणू कार्यक्रमाची गोपनीय माहिती द्यावी लागणार आहे. इराणकडील अणू सुविधा, त्यासाठी वापर करण्यात येत असलेली उपकरणं, कोण देश मदत करत आहेत. अणू कार्यक्रमात कोणते शास्त्रज्ञ काम करत आहेत. अणू कार्यक्रमासंबंधीचे कर्मचारी, हा कार्यक्रम नेमका कुठे सुरू आहे याविषयीची कोणतीही विश्वसनीय माहिती असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषतः या अणू प्रकल्पातील शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती, गुप्त ठिकाणांची माहिती बिनचूक देणाऱ्या जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तीला घसघशीत बक्षीस आणि अमेरिकेत पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेची काळजी सुद्धा अमेरिकाच घेणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…
