भारताच्या कर्जावर जगतो अमेरिका, सत्य समजताच तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
अमेरिकेवर एकूण तब्बल 3,096 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे भारतानेदेखील अमेरिकेला कर्ज दिलेले आहे. याच कर्जाच्या मदतीने अमेरिका आपला कारभार हाकतो.

India Loan to America : सध्या जगात अमेरिका हा एकमेव महासत्ता देश आहे. या देशाने एखादा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जगभरातील देशांवर पडतो. तंत्रज्ञान, विज्ञान, कुशल मनुष्यबळाच्या जोरावर अमेरिकेने मोठी प्रगती केलेली आहे. अमेरिका महासत्ता असल्याने या देशाच्या प्रत्येक भूमिकेकडे जगाचे लक्ष असते. आज जगातील प्रत्येक देश अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले असावेत यासाठी धडपडतो. आज अमेरिकेने इतर लहान देशांना आर्थिक पाठिंबाही दिलेला आहे. परंतु भारताने अमेरिका या महासत्ता देशालादेखील कर्ज दिलेले आहे. याच भाराताच्या पैशांच्या मदतीने अमेरिका आर्थिक गरजा पूर्ण करतो.
अमेरिकेवर एकूण तब्बल 3,096 लाख कोटी रुपयांचे कर्ज
अमेरिकेची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. परंतु याच अमेरिकेने भारताकडूनदेखील कर्ज घेतलेले आहे. भारताने अमेरिकेच्या ट्रेझरी बॉण्डमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याच पैशांच्या मदतीने अमेरिकेच्या गंगाजळीत भारताच्या रुपात परकीय चलनासाठी मोठ्या प्रमाणात उलब्ध आहे. अमेरिकेवर एकूण तब्बल 3,096 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तरीदेखील अमेरिका जगातील महासत्ता आहे.
भारताने किती कर्ज दिलेले आहे?
अमेरिकन सरकार कर्ज घेण्यासाठी ट्रेझरी बॉण्ड, बिल्स आणि सिक्योरिटी जारी करते. याच ट्रेझरी बॉण्डमध्ये भारताने साधारण 234 अब्ज डॉलर्स म्हणजेच 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीमुळे भारताचे चलन अमेरिकेला वापरायला मिळते. भारताच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिर राहायला मदत मिळते.
अमेरिका कुठून कर्ज घेते?
अमेरिकन सरकार त्यांची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज घेते. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही मध्यवर्ती बँक आहे. या बँकेकडून अमेरिकन सरकारला पैसे मिळतात. फेडरल रिझर्व्हने अमेरिकन सरकारला आतापर्यंत 4.70 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज दिलेले आहे. सोबतच सोशल सिक्योरिटी आणि अन्य एजन्सीजने 2.40 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. जपान, चीन, भारत यासारख्या परदेशी गुंतवणूकदार देशांनीही अमेरिकेला एकूण 8.70 ट्रिलियन कर्ज दिलेले आहे.
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला
दरम्यान, अमेरिकेने सध्या व्हेनेझुएला देशावर मोठी कारवाई केली आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या वादात आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
