अमेरिकेने भारताकडे मागितला सल्ला, बांग्लादेशसोबत संबंध मजबूत करण्यावर भर

बाइगन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतली. अमेरिका बांग्लादेशसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असून यासंदर्भात भारताचे मत जाणून घेतल्याची माहिती आहे.

अमेरिकेने भारताकडे मागितला सल्ला, बांग्लादेशसोबत संबंध मजबूत करण्यावर भर
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 4:00 PM

नवी दिल्ली: अमेरिकेचे उप विदेश मंत्री स्टीफन बाइगन सोमवारपासून भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारताचा दौरा संपवून ते बांग्लादेशला रवाना झाले आहेत. बाइगन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतली. अमेरिका बांग्लादेशसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असून यासंदर्भात भारताचे मत जाणून घेतल्याची माहिती आहे. (America takes advice from India to strengthen relations with Bangladesh)

पॅसिफिक महासागरातील चीनचे वर्चस्व मोडून काढण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. एस.जयशंकर आणि स्टीफन बाइगन यांच्यातील चर्चेदरम्यान बांग्लादेश विषयी भारताचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न बाइगन यांनी केला. बाइगन यांनी विदेश सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशी बातचीत केली.

कोरोना काळात चीनने बांग्लादेशसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बाइगन बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. बांग्लादेशातील अमेरिकेच्या उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. बाइगन आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. दोन्ही देशातील संबंध वाढावेत यामध्ये भारताची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन कॅरी आणि हिलरी क्लिंटन यांनी बांग्लादेशमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शेख हसीना यांच्या नेतृत्वात बांग्लादेशचा विकास होत आहे. परकीय गुंतवणूक वाढत आहे, असं भारताकडून अमेरिकेला सांगण्यात आले.

दरम्यान, पॅसिफिक महासागरातील वर्चस्वातून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाला चीनला जबाबदार ठरवले आहे.

संबंधित बातम्या :

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडीओ वायरल, आपण पाहिला का?

चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

(America takes advice from India to strengthen relations with Bangladesh)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.