AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Child: अमेरिकेत 5 वर्षांच्या मुलाला घेतलं ताब्यात! सशस्त्र पोलिसांनी घेराव घातल्याने चिमुकला भेदरला, कारण वाचून तुमचाही होणार संताप…

US Federal Authority: अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनेसोटा येथील एका बालवाडीतून घरी परताणाऱ्या 5 वर्षीय गोड छोकऱ्याला फेडरल एजंटने त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले. त्यामुळे अमेरिकेतच नाही तर जगभरातून संताप व्यक्त केला.

America Child: अमेरिकेत 5 वर्षांच्या मुलाला घेतलं ताब्यात! सशस्त्र पोलिसांनी घेराव घातल्याने चिमुकला भेदरला, कारण वाचून तुमचाही होणार संताप...
अमेरिकेत लहान मुलाला घेतले ताब्यातImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 23, 2026 | 9:17 AM
Share

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनेसोटामधील प्री-स्कूलमधून परतणाऱ्या 5 वर्षीय चिमुरड्याला फेडरल एजंटने त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले. या दोघांना टेक्सासमधील डिटेंशन केंद्रात घेऊन जाण्यात आले. कोलंबिया हाईट्स पब्लिक स्कूल डिस्ट्रिक्टच्या अधिक्षक जेना स्टेनविक यांनी माहिती दिली की, ताब्यात घेण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलांमध्ये लियाम कोनेजो रामोस हा पण एक आहे. या मुलांमध्ये 17 वर्ष, 2 आणि 10 वर्षांचा मुलगा डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. रामोस कुटुंबातील काली मार्क प्रोकोश यांनी माहिती दिली की, मुलं आणि त्याचे वडील हे अमेरिकेत शरणार्थी म्हणून कायदेशीररित्या राहत आहेत.

या गोड चिमुकल्याला ताब्यात घेण्यासाठी सशस्त्र अधिकारी दाखल झाले होते. त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी मुलासह वडिलांना घेराव घातला आणि ताब्यात घेत डिटेंशन केंद्रात नेण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगभरातून अमेरिकेच्या या कृतीचा निषेध होत आहे. केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी या मुलाला कैदासारखं पकडून नेताना दिसत आहेत. या मुलाच्या डोक्यावर एक निळी टोपी असून स्पायडर मॅन असलेली शाळेची बॅग पाठीशी धरली आहे. या व्हिडिओनंतर कमला हॅरिस यांनी सुद्धा संताप व्यक्त केला.

अधिकाऱ्यांचा काय दावा?

होमलँड सुरक्षा विभागानुसार, या मुलाचे वडील एड्रियन अलेक्झँडर कोनेजो एरियस याला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. कारण तो अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या राहत आहे. पण वडील पळून गेल्याने पोलिसांनी मग त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. मुलाला पोलिसांनी कारवाईचा भाग म्हणून ताब्यात घेतल्याने आता वाद विकोपाला गेला आहे. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून कायदेशीर शरणार्थी म्हणून अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्यांना देश सोडण्याविषयी कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. सध्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना टेक्सासमधील डिली येथील डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

कमाल हॅरिस यांनी सुनावले

माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी या सर्व ऑपरेशनवर संताप व्यक्त केला. हॅरिस यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. लियाम केवळ एक लहान मुलं आहे. अधिकाऱ्यांनी त्याचा एका ओलिसासारखा वापर केला. हा प्रकार निंदाजनक असल्याचे हॅरिस यांनी म्हटले आहे. तर लियामच्या शाळा प्रशासनाने पण या घटनेवर नाराजी व्यक्त केली. कोलंबिया हाईट्स स्कूलच्या सुपरिटेंडंट जेना स्टँविक यांनी एका पाच वर्षांच्या निरागस मुलाला अशा प्रकारे ताब्यात घेण्यात आले, तो गुन्हेगार होता का? असा सवाल स्टँविक यांनी केला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.