AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा घेतलेल्या Canada PM जस्टीन टुड्ड्रो यांना आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ही झापलं

जस्टीन टुड्ड्रो यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. कारण त्यांच्या आणखी एका निर्णयाने ते वादात सापडले आहेत. या निर्णयावर पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता एलन मस्क यांनी ही त्यांना झापले आहे. पाहा काय म्हणाले एलन मस्क.

भारताशी पंगा घेतलेल्या Canada PM जस्टीन टुड्ड्रो यांना आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ही झापलं
| Updated on: Oct 03, 2023 | 2:37 PM
Share

india canada tension : भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. भारताने कॅनडातील मुत्सद्दींची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. यासाठी भारताने १० ऑक्टोबरची डेडलाईन देखील दिली आहे. या वाद सुरु असताना भारत कॅनडामधील संबंध ताणले जात आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ही आता कॅनडाच्या पंतप्रधानांना झापलं आहे. SpaceX चे संस्थापक एलोन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  लोकांचे भाषण स्वातंत्र्य दडपल्याचा आरोप मस्क यांनी ट्रुडो यांच्यावर केला आहे. कॅनडा सरकारच्या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी ट्रुडो सरकारवर टीका केली आहे.

कॅनडावर दडपशाही लागू केल्याचा आरोप

कॅनडा सरकारने नवा अध्यादेश काढला आहे ज्यामध्ये सर्व ऑनलाइन स्टीमिंग सेवा सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकेल. कॅनडा सरकारच्या या आदेशावर वेगवेगळ्या स्तरातून आता टीका होऊ लागली आहे. पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिल कॅनडा सरकारवर टीका केलीये.

ज्यामध्ये त्यांनी कॅनेडियन सरकारने जगातील सर्वात दडपशाही ऑनलाइन सेन्सॉरशिप योजना आणली असल्याचं म्हटलं आहे. पॉडकास्ट असलेल्या सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांना सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणी करायला सांगून सरकार ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांवर नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ग्लेन ग्रीनवाल्डच्या या पोस्टला उत्तर देताना एलोन मस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘ट्रूडो कॅनडातील भाषण स्वातंत्र्य संपवू इच्छितात, हे लज्जास्पद आहे.’ कॅनडाच्या ट्रूडो सरकारवर भाषण स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही.

याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये, ट्रूडो सरकारने आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला होता आणि कॅनडाच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात ट्रक चालकांनी कोरोनाची लस घेण्याच्या आवश्यकतेला विरोध केला होता. त्यानंतर कॅनडाच्या सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला.

भारत आणि कॅनडा यांच्यात वाद कायम

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधही सध्या ताणले गेले आहेत.  जूनमध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. भारताने कॅनडाचे आरोप मूर्खपणाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.  दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.