Russia vs Europe : दहशत अशी की, 21 देश एकत्र येऊन रशियाला रोखण्यासाठी बनवतायत एक खास अस्त्र
Russia vs Europe : स्काय शिल्ड प्रोजेक्ट हा युरोपच्या राजकीय एकात्मतेची सुद्धा परीक्षा आहे. जर्मनीने स्वत:च्या खांद्यावर युरोपच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. पण फ्रान्सचा याला विरोध आहे. रशियाच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे युरोपातील अनेक देश एकत्र आले आहेत.

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपने कधी मोठ्या हवाई हल्ल्याच्या संकटाचा सामना केलेला नाही. रशियाच्या युक्रेनवरील ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांमुळे एअर डिफेन्स युरोपच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची बनली आहे. रशिया इराणच्या शाहेद ड्रोनद्वारे वीज केंद्राला लक्ष्य करत आहे. कॅलिबर आणि Kh-101 क्रूझ मिसाइल्स शहरांना लक्ष्य करत आहे. बॅलेस्टिक इस्कंदर मिसाइल्स कमांड सेंटर्स उद्धवस्त करत आहे. युरोपियन देशांना आता त्यांच्या देशावरही असेच हवाई हल्ले होऊ शकतात ही भिती सतावत आहे. म्हणून जर्मनीच्या नेतृत्वाखाली यूरोपीय स्काय शील्ड इनिशिएटिव (ईएसएसआई) प्रोजेक्ट सुरु झाला आहे. युरोपमधील 21 देश मिळून या प्रोजेक्टवर काम करत आहेत. रशियाच्या हवाई हल्ल्याविरोधात एक मजबूत ढाल बनून हे स्काय शिल्ड काम करेल.
ऑगस्ट 2022 मध्ये जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी स्काय शिल्डची घोषणा केली. नाटो आणि ईयू सदस्य देशांनी मिळून एअर डिफेंस सिस्टिमची संयुक्त खरेदी करणं त्यामागे उद्देश होता. जर्मनी, यूनायटेड किंगडम, नेदरलँड्स, इटली, चेक गणराज्य, फिनलँड, नॉर्वे, डेनमार्क, स्वीडन, बेल्जियम, हंगेरी, स्लोवाकिया, रोमानिया, बुल्गारिया, लिथुआनिया, लातविया, एस्टोनिया, ऑस्ट्रिया, स्वित्जरलँड, स्लोवेनिया, अल्बानिया आणि पुर्तगाल हे देश स्काय शिल्डच्या प्रोजेक्टमध्ये आहेत.
कुठल्या एका युरोपियन देशाला बजेटच्या दृष्टीने हा खर्च परवडणारा नाहीय. त्यामुळे स्काय शिल्ड नाटोच्या एकीकृत एअर अँड मिसाइल डिफेंस सिस्टमला (NATINAMDS) मजबूत बनवेल. यूरोपसाठी कोल्ड वॉरनंतरच हे सर्वात मोठं सामूहिक हवाई सुरक्षा कवच असेल. स्काय शिल्ड हे नाटो देशांसाठी रशियन हवाई हल्ले परतवून लावण्याच सुरक्षा कवच असेल.
IRIS-T SLM
जर्मनीच्या Diehl Defence द्वारे विकसित केलेली ही सिस्टिम ड्रोन, विमान, हेलीकॉप्टर आणि क्रूज मिसाइल्सना 40 किमी ते 20 किमी उंचीवर नष्ट करते. याचं TRML-4D AESA रडार 1000 पेक्षा जास्त टार्गेट ट्रॅक करतं. यात कमी सिग्नेचर असलेला UAV सुद्धा आहे. यूक्रेन युद्धात जर्मनीने दिलेल्या या IRIS-T बॅटरीने 90% जास्त यश मिळवलय. खासकरुन शाहेद ड्रोन स्वार्मचे हल्ले परतवून लावले.
Patriot PAC-3 MSE
अमेरिकी Raytheon आणि Lockheed Martin ची ही सिस्टिम बॅलेस्टिक मिसाइल, क्रूज मिसाइल आणि फायटर जेट्सपासून बचाव करते. PAC-3 MSE वेरिएंट बॅलेस्टिक टारगेट वर 60 किमी आणि विमान/क्रूज मिसाइल 160 किमी अंतरावर असताना नष्ट करते. जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन आणि पोलंड या देशांकडे पहिल्यापासून ही सिस्टिम आहे. यामुळे एकीकरण अजून सोप होईल.
Arrow-3
इस्रायलची Israel Aerospace Industries आणि Boeing ची ही सिस्टिम 2000 किमी पेक्षा जास्त अंतरावर आणि 100 किमी उंचीवर बॅलेस्टिक मिसाइल्स पाडते.जर्मनीने 2023 मध्ये या सिस्टिमसाठी 4 अब्ज यूरोचा कॉन्ट्रॅक्ट साइन केला. डिलीवरी 2029-2030 पर्यंत होईल.
स्काय शिल्ड ही ‘डिफेंस-इन-डेप्थ’ मॉडल आहे. IRIS-T शहरं आणि इन्फ्रास्ट्रक्चरला ड्रोनपासून वाचवेल. Patriot सैन्य बेस आणि शहरांना क्रूज/शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक आणि Arrow-3 लांब पल्ल्याच्या/हायपरसोनिक मिसाइल हल्ल्यापासून बचाव करेल. हे सर्व नाटो नियंत्रित नेटवर्कमध्ये इंटीग्रेटेड म्हणजे समावेश असेल.
