Oscars 2021: बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, ‘ब्लॅक पँथर’ला मागे टाकत ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

जगाचं लक्ष लागलेल्या यंदाच्या बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कारांची (Oscar ceremony) घोषणा झालीय. यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अँथोनी हॉपकीनला (Anthony Hopkins) मिळालाय.

Oscars 2021: बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, 'ब्लॅक पँथर'ला मागे टाकत 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

लॉस एंजलिस : जगाचं लक्ष लागलेल्या यंदाच्या बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कारांची (Oscar ceremony) घोषणा झालीय. यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अँथोनी हॉपकीनला (Anthony Hopkins) मिळालाय. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी ब्लॅक पँथर चित्रपटातील अभिनेता चँडविक बोसमनही (Chadwick Boseman) स्पर्धेत होता. अँथोनीने चँडविकला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. चँडविकचं मागील वर्षीच कॅन्सरशी लढा देताना निधन झालं होतं. तो मा रेनी ब्लॅक बॉटम या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्करसाठी नामांकित झाला होता. दुसरीकडे चीनच्या क्लोइ चाओ (Chloe Zhao) यांना नोमाडलँड चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला. 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात याशिवाय अनेक पुरस्कारांचीही घोषणा झालीय (Announcement of Oscars Award 2021 read full list).

नोमाडलँड चित्रपटाला तब्बल 3 ऑस्कर

क्लोइ चाओ त्यांच्या वर्णातील पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्यांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलंय. याशिवाय ऑस्कर जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. नोमाडलँडमधील अभिनेत्री फ्रान्सेस एमसीडोर्मांड (Frances McDormand) हिने तिचा तिसरा ऑस्कर पुरस्कार जिंकलाय. नोमाडलँड चित्रपटाने या सोहळ्यात तब्बल 3 ऑस्कर जिंकलेत. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यांचा समावेश आहे. नोमाडलँडमधील भूमिकेसाठी अभिनेत्री फ़्रांसिस मॅक्डॉरमँडला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

“जगात जेथं गेले तिथं मला चांगलेपणच वाट्याला आलं”

प्रसिद्ध अभिनेते अँथनी हॉपकिन्स यांना वयाच्या 83 व्या वर्षी चित्रपट ‘द फादर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ते सर्वाधिक वयाचे ऑस्कर पुरस्कार्थी ठरलेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या क्लोई चाओ म्हणाल्या, ‘मी या जगात जेथे कोठे गेले ज्यांना भेटले त्यांच्याकडून मला चांगलेपणच वाट्याला आलंय. मला मिळालेला हा ऑस्कर पुरस्कार मी चांगले बनून राहण्यात विश्वास असणाऱ्या आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्यांना अर्पण करते. हा पुरस्कार तुम्हा सर्वांसाठी आहे. तुम्ही मला नेहमीच प्रेरणा देतात.”

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये डॉल्बी थिएटर आणि यूनियन स्टेशन अशा दोन ठिकाणी घेण्यात आला. 2001 पासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन डॉल्बी थिएटरमध्येच होत आलंय.

हेही वाचा :

14 विभागात नामांकनं आणि 11 ऑस्कर पुरस्कारांवर नावं, जाणून घ्या ‘टायटॅनिक’बद्दल

Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?

Bhanu Athaiya | भारताचे ‘ऑस्कर’स्वप्न पहिल्यांदा साकारणाऱ्या भानू अथैया कालवश

व्हिडीओ पाहा :

Announcement of Oscars Award 2021 read full list

Published On - 11:55 pm, Mon, 26 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI