AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बांगलादेशचा अत्यंत मोठा निर्णय, थेट भारतातील अधिकाऱ्यांनाच…

भारत आणि बांगलादेशातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात बघायला मिळाली. बांगलादेशातील हिंदू लोकांवरील अत्याचार प्रचंड वाढले. तारीक रहमान यांनी बांगलादेशातील सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून हा तणाव कमी होताना दिसत आहे.

मोठी बातमी! बांगलादेशचा अत्यंत मोठा निर्णय, थेट भारतातील अधिकाऱ्यांनाच...
Bangladesh Prime Minister Tarique Rahman
| Updated on: Feb 23, 2026 | 8:02 AM
Share

बांगलादेशात मोठ्या हिंसाचारानंतर सत्ता परिवर्तन झाले. सुरूवातीपासूनच भारत आणि बांगलादेशातील संबंध तसे चांगले राहिले. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे संबंध ताणताना दिसली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला निवडणुकीत बहुमत मिळाले आणि तारिक रहमान यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. बांगलादेशचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तारीक रहमान मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. शिवाय त्यांच्याकडून भारतासोबतचे संबंध सुधारण्याकरिता प्रयत्नही केला जात आहे. काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू लोकांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. आता तारीक रहमान यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून हिंदू लोकांवरील होणारे अत्याचार कमी झाली. यादरम्यान त्यांनी लष्करात मोठे फेरबदल करण्याचाही निर्णय घेतला. कारण  बांगलादेशमधील हिंसाचार बघता हे निर्णय घेणे महत्वाचे आहे.

लष्कराने भारतातील बांगलादेश उच्चायुक्तालयात पूर्वी काम करणाऱ्या व्यक्तीकडे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ढाकामधील एका वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. लेफ्टनंट जनरल एम. मैनुर रहमान यांची सीजीएस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा मोठा बदल नक्कीच म्हणावा लागेल. लेफ्टनंट जनरल एम. मैनुर रहमान यांनी यापूर्वी आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रिन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम केले.

भारतातील बांगलादेश उच्चायोगाचे सुरक्षा सल्लागार ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हफिजुर रहमान यांना मेजर जनरल पदाच्या इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांना भारतातून परत बांगलादेशात बोलावण्यात आले. मागील काही वर्षांपासून ते भारतातील बांगलादेश उच्चायोगाचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत होते.

तारीक रहमान यांनी अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, ज्यावेळी बांगलादेश अनेक समस्यांना झुंज देत आहे. बांगलादेशात प्रचंड तणावाची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच मोठा हिंसाचार झाला. भारतही दुरावला गेला. बांगलादेशातील भारतीय दूतावास कार्यालयावरही मोठा हल्ला करण्यात आला होता. ज्याचा भारताकडून जोरदार समाचार घेण्यात आला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा