AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान तारीक रहमान..

भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी याकडे पाठ फिरवली. यासोबतच त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले. पुन्हा एकदा भारताबद्दल धक्कादायक विधान बांगलादेशकडून करण्यात आले.

बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान तारीक रहमान..
Bangladesh
| Updated on: Sep 14, 2026 | 7:34 AM
Share

ब्रिक्स परिषदेचे आयोजन यंदा भारतात करण्यात आले. यावेळी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. यादरम्यान बांगलादेशकडून मोठा आरोप करण्यात आला. भारताने ब्रिक्स परिषदेच्या सदस्याला आमंत्रित केले. आमच्या पंतप्रधानांना नाही. आता बांगलादेशच्या पोटात गोळा आला. आता ब्रिक्स परिषदेत सहभागी न होण्याच्या मुद्द्यात बांगादेशकडू मोठे विधान करण्यात आले. शिवाय भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवरही त्यांनी विधान केले. तारीक रहमान यांच्या सरकारमधील मंत्री हुमायूं कबीर यांनी म्हटले की, आम्ही बाकी देशांप्रमाणेच भारतासोबतही नेहमी चर्चा करू शकत नाहीत. मात्र, यादरम्यानच त्यांनी म्हटले की, आम्हाला भारतासोबतचे व्दिपक्षीय संबंध पुन्हा एकदा चांगले करून पुढे न्यायचे आहेत.

हुमायूं कबीर यांच्या माहितीनुसार, ढाका आणि दिल्लीचे 15 वर्षांचे संबंध आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांनी ब्रिक्स परिषदेकडे पाठ फिरवली. हुमायूं कबीर यांनी पुन्हा म्हटले की, बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारताने आमंत्रित केले नव्हते. आता बांगलादेशची भाषा बदलली. हुमायू कबीर यांना विचारण्यात आले की, संयुक्त राष्ट्र महासभेनंतर तारीक रहमान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेणार का?

या प्रश्नावर उत्तर देताना हुमायूं कबीर यांनी म्हटले की, आम्ही प्रत्येक वेळी नाश्ता, लंच आणि डिनर यादरम्यान फक्त भारताबद्दल विचार करत नाहीत. आम्हाला भारताबद्दल विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहेत. त्यातच आता पुन्हा भारताबद्दल विधान करताना बांग्लादेश दिसत आहे. भारतासोबतच संबंध बांगलादेशला सुधारवायची आहेत. मात्र, त्यांना पुढेही यायचे नाही.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले होण्यापेक्षा अधिक तणावात आहेत. त्यातच बांगलादेशकडून धक्कादायक विधान करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि चीन यांच्या अधिक जवळ बांगलादेश जात आहे. बांगलादेशचे अधिकारी काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये गेले होते. तीस्का नदीच्या कराराचा मुद्द्याही आहे. भारत आम्हाला न्याय देईल, असे बांगलादेशला वाटते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच