AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Crisis : बांग्लादेशला रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवावं लागणार, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Oil Crisis : मध्य पूर्वेतील युद्धामुळे सगळी समीकरणं बदलली आहेत. बांग्लादेशात गंभीर तेल संकट आहे. आता त्यांच्यावर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली आहे. कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Oil Crisis : बांग्लादेशला रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवावं लागणार, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही
Oil Crisis
| Updated on: Apr 13, 2026 | 1:51 PM
Share

अमेरिका-इस्रायलचं नाक दाबण्यासाठी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक ठप्प करुन ठेवली आहे. जगाचं 20 टक्के तेल या मार्गावरुन येतं. हॉर्मुज पार करण्यासाठी इराणची परवानगी अनिवार्य बनली आहे. त्यामुळे इराण विरुद्ध युद्धाला सुरुवात झाल्यापासून जगतील अनेक देशात तेल संकटाची समस्या गंभीर बनली आहे. काही देशांना लॉकडाऊन सारखी पावलं उचलावी लागली आहेत. ज्या देशांकडे काही महिन्यांच्या तेल साठ्याची व्यवस्था नाहीय, तिथे वाईट स्थिती आहे. बांग्लादेश वर सुद्धा या युद्धाचा परिणाम झालाय. या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी बांग्लादेशने एक नवीन रणनिती आखली आहे. त्यासाठी त्यांना भारताची मदत लागणार आहे. बांग्लादेश आता रशियाकडून तेल विकत घेईल. भारतात ते तेल रिफाईन करेल. मग भारतातूनच ते तेल बांग्लादेशला घेऊन जाईल.

कच्चा तेलाची खरेदी, भारतात रिफायनिंग आणि तयार इंधनाची वाहतूक हा सर्व खर्च बांग्लादेशच उचलणार आहे. इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलय. या संदर्भात बांग्लादेशच्या ऊर्जा आणि खनिज संसाधन विभागाने ऊर्जा मंत्री इकबाल हसन महमूद तुकु यांना प्रस्ताव पाठवला आहे. या करारावर भारतासोबत चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे चर्चेची परवानगी मागितली आहे.

बांग्लादेशला भारताची गरज का लागली?

बांग्लादेशकडे फक्त चटगांवर येथे एक सरकारी रिफायनरी आहे. तिची वार्षिक क्षमता 1.5 मिलियन टन आहे.

ही रिफायनरी प्रामुख्याने पश्चिम आशियाच्या कच्चा तेलासाठी बनवलेली आहे.

रशियन कच्च तेलं हेवी ग्रेड असतं. त्यावर प्रोसेस करण्यासाठी चटगांव रिफायनरी सक्षम नाहीय.

म्हणूनच बांग्लादेशला तयार पेट्रोलियन उत्पादनांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून रहावं लागतं.

दोन्ही देशात 15 वर्षांचा करार

बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारताकडून डिझेल आयात वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये पहिल्यापासून ऊर्जा क्षेत्रात मजबूत संबंध आहेत.

डीझेल पाइपलाइन : भारतात सिलिगुडी ते परबतिपूर बांग्लादेशपर्यंत इंडिया-बांग्लादेश पाइपलाइन आधीपासून चालू आहे.

नुमालीगढ़ रिफायनरी : या पाइपलाईन मार्गाने बांग्लादेश भारताच्या नुमालीगढ रिफायनरीतून डिझेल घेत आहे. त्यासाठी 2023 साली दोन्ही देशात 15 वर्षांचा करार झाला आहे.

भारताने आतापर्यंत किती हजार टन डिझेलचा पुरवठा केलाय?

युद्ध काळातच भारताने बांग्लादेशला अतिरिक्त 5000 टन डिझेलचा पुरवठा केला होता. भारताकडून बांग्लादेशला आतापर्यंत 15 हजार टन डिझेल मिळालं आहे. हे डिझेल इंडिया-बांग्लादेश फ्रेंडशिप पाइपलाइनमार्गे परबतिपूर डेपोला पाठवण्यात आलं.

पाइपलाइन पुन्हा कधी सुरु झाली?

भारत-बांग्लादेश फ्रेंडशिप पाइपलाइन वर्ष 2024 मध्ये बंद झालेली. शेख हसीना सरकार विरुद्ध जन आंदोलनानंतर ही पाइपलाइन बंद करण्यात आलेली. फेब्रुवारी 2026 मध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशात नवीन सरकार आल्यानंतर पाइपलाइन पुन्हा सुरु करण्यात आली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…