AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : जाता-जाता इस्रायलने आणखी एक मोठा डाव साधला, इराणसाठी मोठा झटका

Iran Israel War : युद्ध थांबण्याच्या काहीतास आधी इस्रायलने एक मोठ मिशन यशस्वी केलं आहे. इस्रायलच्या तो दीर्घकालीन रणनितीचा एक भाग आहे. इराणने अल-उदीद एअरबेसवरील हल्ल्यानंतर आपला बदला पूर्ण झाला असं म्हटलं. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये सीजफायर झाल्याची घोषणा केली.

Iran Israel War : जाता-जाता इस्रायलने आणखी एक मोठा डाव साधला, इराणसाठी मोठा झटका
Iran
| Updated on: Jun 24, 2025 | 3:50 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये आता सीजफायर झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये आपण यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. काल इराणने कतरच्या रिकाम्या अल-उदीद एअरबेसवर एअरस्ट्राइक केला. हा अमेरिकेचा एअरबेस आहे. शनिवारी-रविवारी मध्यरात्री अमेरिकेने इराणमध्ये घुसून जो एअरस्ट्राइक केला, अल-उदीद एअरबेसवरील हल्ला त्याचा बदला होता. इराणने या हल्ल्यानंतर आपला बदला पूर्ण झाला असं म्हटलं. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये सीजफायर झाल्याची घोषणा केली. पण सीजफायरची घोषणा होण्याआधी इस्रायलने आणखी एक महत्त्वाच ऑपरेशन यशस्वी केलं. इराणसाठी मोठा हा झटका आहे.

इस्रायलने काल रात्री सुद्धा उत्तर इराणमध्ये हवाई हल्ले केले. या एका हवाई हल्ल्यात इराणचे अणवस्त्र वैज्ञानिक मोहम्मद रेझा सिद्दीघी साबेर ठार झाले. हा इराणसाठी मोठा झटका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायरची घोषणा करण्याच्या काहीवेळ आधी हे ऑपरेशन झालं. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने मंगळवारी ही माहिती दिली. अस्ताने ये अश्राफिये येथे पालकांच्या घरी असताना मोहम्मद रेझा सिद्दीघी साबेर एअरस्ट्राइकमध्ये ठार झाले. काही दिवसांपूर्वी साबेर यांचा 17 वर्षांचा मुलगा तेहरान येथे दुसऱ्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झाला होता. मोहम्मद रेझा सिद्दीघी साबेर यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध होते.

इराणसाठी हा मोठा झटका

मोहम्मद रेझा सिद्दीघी साबेर यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा झटका आहे. इराणने 12 जूनच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरु केलं. त्यावेळी इराणचा अणवस्त्र कार्यक्रम नष्ट करणं हे त्यांचं पहिलं उद्दिष्टय होतं. त्यानुसार इस्रायलने इराणच्या अणवस्त्र वैज्ञानिकांना वेचून-वेचून ठार मारलं, जेणेकरुन इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाला खीळ बसावी. दुसऱ्याबाजूला त्यांचे इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले सुरुच होते. फॉर्डो येथील अणवस्त्र तळ सर्वात जास्त महत्त्वाचा होता. काहीशे फूट जमिनीखाली हा संपूर्ण प्रकल्प होता. तिथे फक्त अमेरिकेचा GBU 57 हा बॉम्बच पोहोचू शकत होता. अखेर अमेरिकेने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री बंकर बस्टर बॉम्बने हा तळ उडवला. त्यामुळे इराणसाठी हा मोठा झटका आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.