AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Golden Opportunity : भूतान झाला प्रसन्न! 26 हजारांनं स्वस्त मिळवा प्युअर सोनं, पण करावे लागेल हे काम

Golden Opportunity : भूतानने भारतीयांसाठी सोने खरेदीची खास ऑफर आणली आहे. भारतीयांना प्युअर सोनं 26 हजारांनं स्वस्त मिळणार आहे. सध्या भारतात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपये सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करायचं असेल तर भूतानमध्ये जावे लागेल. विशेष म्हणजे भारतीयांसाठी इथं व्हिसाचीही गरज नाही.

Golden Opportunity : भूतान झाला प्रसन्न! 26 हजारांनं स्वस्त मिळवा प्युअर सोनं, पण करावे लागेल हे काम
| Updated on: Mar 05, 2023 | 10:40 AM
Share

नवी दिल्ली : आपल्या हिमालयाच्या कुशीत पहुडलेला आणि सर्वात आनंदी देश भूतान. या भूतानने (Bhutan) भारतीय नागरिकांसाठी विशेष ऑफर (Golden Offers) आणली आहे. भारतीयांना प्युअर सोनं (Pure Gold) 26 हजारांनं स्वस्त मिळणार आहे. सध्या भारतात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या आताबाहेर आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करायचं असेल तर भूतानमध्ये जावे लागेल. विशेष म्हणजे भारतीयांसाठी इथं व्हिसाचीही (Visa) गरज नाही. पण त्यासाठी एक अट आहे. ती अट तुम्हाला पूर्ण केली तरच स्वस्तात सोने खरेदी करता येईल. भारतात सोन्याचे दर झरझर गगनाला भिडलेले असताना शंभर नंबरी सोने तुम्हाला 26 हजारांनं स्वस्त खरेदी करता येईल. एका भारतीय नागरिकाला परदेशातून 50,000 रुपयांचं सोनं मोफत आणता येते. मग कुटुंबकबिल्यासह केव्हा निघताय खरेदीला?

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सर्वच गोष्टी तर सहज साध्य होत आहे. मग अट तरी कोणती घातली असेल भूतान देशाने. तर ही अट ही तुमच्या फायद्याचीच आहे. तुमची हवापालट होईल. पर्यटनाचा आणि स्वतःला शोधण्याचा मार्ग तुम्हाला गवसेल. तुम्हाला भूतान देशात कमीतकमी एक दिवस तरी थांबावे लागेल. त्यांच्या आदरतिथ्याचा स्वीकार करावा लागेल. म्हणजेच काय भूतानमध्ये तुम्हाला पर्यटनासाठी खर्च करावा लागेल.

भारतीय नागरिकांनी भूतानमध्ये जाऊन तिथला शाश्वत विकास खर्च उचलल्यास (Sustainable Development Cost) फुंटशोलिंग आणि थिंफू या राजधानीच्या ठिकाणी त्यांना शुल्क मुक्त सोने खरेदी करता येईल. या हिमालयीन राष्ट्राच्या या सुवर्णसंधीचा भारतीयांना मोठा फायदा होईल. 10 जण सोबत गेल्यास त्यांना पाच लाखांचे सोने भारतात खरेदी करुन आणता येईल.

सध्या भारतात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या आताबाहेर आहे. हा भाव विक्रमी 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. त्यामानाने भूतानमधील सोन्याचा भाव स्वस्त आहे. भूतानला स्थानिक भाषेत ड्रुग युल असे म्हणतात. सध्या भूतानी बीटीएन 40, 286 चलनात 24 कॅरेट सोने मिळते. भारत आणि भूतानच्या चलनाची तुलना केल्यास भारतीय चलन महाग आहे.

भारतीय नागरिकांना भूतानमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी जवळपास 40,286 रुपये द्यावे लागतील. पण त्यासाठी भारतीयांना भूतानचा दौरा आखावा लागेल. या देशात त्यांना कमीत कमी एक दिवस तरी थांबावे लागेल. येथील शाश्वत विकास खर्चाचा कर द्यावा लागेल .प्रत्येक दिवशी हा कर 1,200 रुपये आहे. भूतानच्या पर्यटन विभागाच्या मान्यता प्राप्त हॉटेल्समध्ये कमीत कमी एक रात्र थांबावे लागेल.

भूतानच्या नॅशनल असेम्बलीत 2022 मध्ये एक कायदा तयार करण्यात आला. त्यानुसार, भूतानमध्ये आलेल्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन कर देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी भारतीय नागरिकांना प्रत्येक दिवशी 1,200 रुपये कर मोजावा लागेल. तर इतर देशांच्या पर्यटकांना $ 65 ते $ 200 मोजावे लागतील.

यापूर्वी भारत, मालदीव, बांग्लादेशाच्या नागरिकांना पर्यटन शुल्क द्यावा लागत नव्हता. त्यांना मोफत प्रवेश देण्यात येत होता. परंतु, सप्टेंबर 2022 मध्ये एका कायद्याने हा कर लागू करण्यात आला. कोविड काळात भूतानमध्ये परदेशी नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. 30 महिन्यानंतर भूतानच्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या सध्याच्या नियमानुसार, परदेशातून येणाऱ्या कोणत्या ही भारतीय नागरिकाला 50,000 रुपयांचे सोने, जवळपास 20 ग्रॅम सोने देशात आणता येते. एक भारतीय महिला 1 लाख रुपयांचे सोने, जवळपास 40 ग्रॅम सोने, कोणतेही शुल्क न भरता आणू शकतात. 21 फेब्रुवारी रोजी भूतानने भारतीयांसाठी ही खास ऑफर आणली. भूतानमधील स्थानिक वृत्तपत्र कुएनसेलमध्ये याची माहिती देण्यात आली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.