इराणकडून जशास तसं उत्तर, अमेरिकेच्या बेसवर शक्तिशाली हल्ला, ट्रम्प चिंतेत
इराणने अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे.

इराणने अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. इराणी सैन्याने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर 9 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. दोहामधील हवाई क्षेपणास्त्र प्रणाली इराणी क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न करत आहे. इराकमध्ये इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखण्यात आले आहे. आता कुवेत आणि बहरीनमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे. इराणने याआधीच अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे असं कतारने सांगितले होते. इराणच्या धमकीनंतर दोहाला जाणाऱ्या डझनभर विमानांचा मार्ग वळवण्यात आला होता.
इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर
लंडनहून कतारला जाणारे विमान वळवण्यात आले आहे. अमेरिका, चीन आणि ब्रिटनने आधीच त्यांच्या नागरिकांना सतर्क केले होते. अमेरिकेने अणु तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. इराणी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते की, ‘आम्ही अमेरिकेला योग्य उत्तर देऊ.’ इराणने जे सांगितले तेच केले आहे.
बहरीनमध्ये ब्लॅकआउट
इराकमधील अमेरिकेच्या हरीर तळावर स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. आका कतार आणि इराकमधील अमेरिकन तळांवर झालेल्या इराणी हल्ल्यानंतर बहरीनमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या खूपच वाईट झाली आहे.
भविष्यात आणखी धोकादायक हल्ले करणार
कतार आणि इराकमधील हल्ल्यांनंतर इराणने अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. इराणी सैन्याने म्हटले की, ‘जर अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही मध्य पूर्वेतून अमेरिकेचे नामोनिशाण मिटवून टाकू. हा ऑपरेशन फतहचा ट्रेलर आहे. आम्ही भविष्यात आणखी धोकादायक हल्ले करू.’
दरम्यान, इराणच्या हल्ल्यांवर अमेरिका बारीक लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ सैन्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
