पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीबद्दल मोठा दावा, अमेरिकन प्रशासनाने…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत धक्का दिला. हेच नाही तर भारतावर टॅरिफ लावण्याचे कारणही त्यांनी सांगून टाकले. मात्र,डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा वाईट परिणाम हा अनेक क्षेत्रामध्ये झाल्याचे बघायला मिळत आहे. आता मोठा खुलासा करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावताना एक विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र आहेत…पण मला त्यांच्यावर टॅरिफ लावावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चांगले नाते होते. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणले आहे. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन घेणे देखील बंद केले. आता डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या नात्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा होताना दिसतोय.
टॅरिफच्या मुद्द्यावरून दोन्ही देशातल्या नेत्यांचे संबंध देखील ताणले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचे वैयक्तिक नाते खूप चांगले होते. पण आता ते राहिले नाही. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील नाते संपले आहे. आता काहीही राहिले नाहीये. मुळात म्हणजे विषय असा आहे की, जर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यतील नाते चांगले असेल तर रशिया आणि अमेरिका यांच्यातीलही नाते चांगले राहते.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील नाते ताणले असल्याने भारत आणि अमेरिकेतही तणाव वाढला आहे. चीन आणि रशियासोबत भारताची जवळीकता अधिक वाढली आहे, यामुळे नरेंद्र मोदी यांची मोठे संकेत दिली आहेत. पूर्वीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील खास मैत्रीचे नाते होणे शक्य नसल्याचाही अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे आताही सांगताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसतात.
पुतिन यांनी ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली, त्यावेळी युक्रेन युद्धाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, या बैठकीतून निर्णय काहीच होऊ शकला नाही. विशेष म्हणजे भारतावर टॅरिफ लावल्यानंतर लगेचच पुतिन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला गेले. पुतिन यांनी या भेटीमध्ये नेमके काय झाले हे देखील नरेंद्र मोदी यांना फोन करून सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत आहे, हे पटत नाहीये. यामुळेच भारतावर इतका मोठा टॅरिफ लावण्यात आला आहे.
