VIDEO: Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भयानक अपघात, प्रचंड वेगाने धावणाऱ्या रेल्वेंची धडक, 32 जणांचा मृत्यू, 66 जखमी

इजिप्तमध्ये (Egypt) शुक्रवारी (26 मार्च) झालेल्या एका भीषण रेल्वे अपघातात (Train Accident) अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

VIDEO: Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भयानक अपघात, प्रचंड वेगाने धावणाऱ्या रेल्वेंची धडक, 32 जणांचा मृत्यू, 66 जखमी


कैरो : इजिप्तमध्ये (Egypt) शुक्रवारी (26 मार्च) झालेल्या एका भीषण रेल्वे अपघातात (Train Accident) अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, दोन वेगवान धावणाऱ्या रेल्वेंच्या धडकेत 32 लोकांचा मृत्यू झालाय, तर 66 लोक जखमी जालेत. ही घटना इजिप्तमधील सोहाग प्रांतात घडली. रेल्वेच्या धडकेने 3 डब्बे रेल्वेमार्गावरुन खाली गेले आणि त्यात अनेकांनी आपला जीव गमावला (Big Train Accident in Egypt due to collisions of two trains).

रेल्वेच्या धडकेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघातामागील कारणांचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे याआधी इजिप्तची राजधानी कैरोमधील रॅम्स स्टेशनवर 2 वर्षांपूर्वी असाच एक भयानक रेल्वे अपघात घडला होता. या अपघातात 24 लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या धडकेनंतर एक मोठा स्फोटही झाला होता.

इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने या अपघाताविषयी अधिकृत माहिती देताना म्हटलं, “अपघात स्थळावर उपचार आणि मदत पोहचवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.” सोशल मीडियावर या अपघाताचे काही फोटो शेअर केले जात आहेत. त्यात धडक झाल्याने दोन्ही रेल्वेचे काही डब्बे एकमेकांवर चढल्याचं दिसत आहे. स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळावरील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेकने अपघात झाल्याचा संशय

इजिप्तमध्ये अशाप्रकारचे अपघात सामान्य गोष्ट असल्याचं सांगितलं जातं. मागील दशकात रेल्वेचे असे अनेक अपघात घडले आहेत. इजिप्तचे नागरिक देशातील दूरच्या भागांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांच्या खराब स्थितीविषयी वारंवार तक्रार करत असतात. मात्र, सरकारकडून त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. दरम्यान, सरकारकडून संचालित होणाऱ्या नील टेलीव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, इजिप्त सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे विभागाने आपल्या अधिकृत वक्तव्यात अज्ञात लोकांनी रेल्वेत इमरजन्सी ब्रेक लावल्याचा आरोप केलाय.

हेही वाचा :

चार वर्षात कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर हजारापेक्षा जास्त अपघात, शेकडो मृतदेह बेवारस

मुलगी घरातून रागाने गेली, बाहेर गेल्यानंतर ट्रेनमधून पडून मृत्यू

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Big Train Accident in Egypt due to collisions of two trains

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI