AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुनीर आर्मीला झटका ! पाकिस्तानमधील 2 भाग लष्कराच्या कंट्रोलमधून बाहेर

BLA Major Attack Pakistan Army: बलुचिस्तानमधील प्रकरण शांत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने 150 बलूच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयानंतरही बलुच आर्मीने हल्ले थांबवले नाही.

मुनीर आर्मीला झटका ! पाकिस्तानमधील 2 भाग लष्कराच्या कंट्रोलमधून बाहेर
मुनीर यांना धक्का.Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 10, 2025 | 10:01 AM
Share

BLA Major Attack Pakistan Army: भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. या तणावात पाकिस्तानचे लष्कप्रमुख असमी मुनीर यांना जोरदार झटका बसला आहे. हा धक्का मुनीर सेनेला बलुचिस्तानमधून बसला आहे. बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तान लष्कराकडून दोन भूभाग ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही भाग बलुचिस्तानमधील आहेत.

द बलुचिस्तान पोस्टनुसार, बलुचिस्तानमधील बलूच सैन्याने पाकिस्तानवरील हल्ले वाढवले आहे. शुक्रवारी या सैन्याने केच, पंजगुर आणि लासबेला जिल्ह्यात हल्ले केले. केच आणि पंजगुर हा भाग बलूच आर्मीने ताब्यात घेतला आहे. या भागात बलूच आर्मीने आधी नाकाबंदी केली. त्यानंतर पाकिस्तान सरकारचे कार्यालये आणि लष्करी जवानांना हाकलून लावले. केचमधील सरकारी कार्यालयांना आग लावून टाकली. त्यानंतर कार्यालयातून सरकारी कर्मचारी पळून गेले. बलूच आर्मीने हा आपला भूभाग असल्याचा दावा केला.

पंजगुरमध्येही नाकाबंदी करुन हल्ला करण्यात आला. लासबेलामध्ये बलुच आर्मीला विरोध करणाऱ्या तिघांची गोळी मारुन हत्या करण्यात आली. मागील पाच तासांपासून बलुच आर्मीने अनेक भागांवर हल्ला केला आहे. बलुचिस्तानमधील प्रकरण शांत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने 150 बलूच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयानंतरही बलुच आर्मीने हल्ले थांबवले नाही.

बलुचिस्तानमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री फजलुर रहमानने सरकारला इशारा देत सांगितले की, सर्व सैन्याला सीमेवर पाठवून दिले तर देशातंर्गत परिस्थिती कोण सांभाळणार? पाकिस्तानमधील खैबर, गिलिगिट आणि बलुचिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. बलुचिस्तानने शुक्रवारी गॅस पाईप लाईनसुद्धा उडवून दिला होती. यामुळे भारताशी पंगा घेतल्यानंतर पाकिस्तान देशातंर्गत परिस्थितीमुळेही अडचणीत आला  आहे. पाकिस्तानमधील या परिस्थितीमुळे लष्करप्रमुख मुनीर यांच्याविरोधात लष्करातून बंड करण्याचा तयारीत आहे.

दुसरीकडे बलुचिस्तानने भारताकडे दिल्लीत दुतावास सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाकडे बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची विनंती केली होती.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.