Brazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तरीही फुटबॉल लीगचं आयोजन, रोनाल्डोकडूनही टीका

ब्राझिलच्या 21 कोटी लोकसंख्यैपकी 30 लाखांहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Brazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तरीही फुटबॉल लीगचं आयोजन, रोनाल्डोकडूनही टीका

ब्रासिलिया : ब्राझिल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित देश बनला आहे (Brazil Football League). ब्राझिलच्या 21 कोटी लोकसंख्यैपकी 30 लाखांहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Brazil Football League).

हे आकडे ब्राझिलमधल्या कोरोनाचा उद्रेक सांगण्यासाठी पुरेसे आहेत. 21 कोटी लोकसंख्येच्या ब्राझिलमध्ये मे महिन्यानंतरच्या प्रत्येक दिवसाला 1 हजारांहून जास्त लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. इथल्या राष्ट्रपतींची एक वेळा नाही, तर तब्बल तीन-तीन वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

ब्राझिलमध्ये फुटबॉल लीगचं आयोजन

ज्या ब्राझिलमध्ये खेड्यापासून ते शहरापर्यंत आणि राजापासून ते रंकापर्यंत, चौफेर कोरोना पसरला आहे. त्याच ब्राझिलमध्ये फुटबॉल लीगचं आयोजन होतं आहे.

ब्राझिलमध्ये होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे 3 महिने लांबणीवर पडली. मात्र, कोरोनाचा उद्रेक कायम असतानाच 8 ऑगस्टपासून पुन्हा स्पर्धा सुरु केली गेली. शनिवारी इथं एकूण 3 फुटबॉल सामने खेळले गेले (Brazil Football League).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

फुटबॉल स्पर्धा भरवणाऱ्या ब्राझिलवर रोनाल्डोकडून टीका

इतर फुटबॉलपटूंनी सामने खेळण्यास होकार दिला आहे. मात्र, प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोनं कोरोनाच्या काळात फुटबॉल स्पर्धा भरवणाऱ्या ब्राझिलवर टीका सुद्धा केली.

18 जूनला ब्राझिलच्या माराकाना मैदानात सामन्याची घोषणा झाली. रियो दी जेनेरोच्या स्पर्धेत दोन संघामध्ये फुटबॉल मॅच झाली. तेव्हा सुद्धा रोनाल्डोनं ब्राझिल सरकारला सतर्क केलं होतं. तो सामना जेव्हा सुरु झाला, तेव्हा ब्राझिलमधल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाख होता. म्हणजे आत्ताच्या रुग्णसंख्येपेक्षा 21 लाखांनी कमी होता.

18 जून ते 10 ऑगस्ट या काळात ब्राझिलमध्ये कोरोनाचे रुग्ण सुसाट वेगानं वाढले. कोरोनाबाबत ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी सुरुवातीच्याच काळात गंभीर चुका केल्या. त्याचे परिणाम सारा देश भोगतो आहे. मात्र, तरी सुद्धा त्यातून तिथल्या सरकारनं धडा घेतलेला नाही. ब्राझिलच्या प्रत्येक 2 हजार लोकांमागे 30 लोक कोरोनाग्रस्त निघत आहेत. तरीही 18 जूनपासून ब्राझिलमध्ये फुटबॉल सुरु आहे आणि आता तर थेट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलं गेलं आहे.

ब्राझिलच्या आजूबाजूच्या देशांवर नजर टाकली तर पेरु, चिली, इक्वोडोर, अर्जेंटिना हे सर्व फुटबॉलप्रेमी देश आहेत. ब्राझिल इतकंच या देशांमध्येही फुटबॉलचं वेड आहे. मात्र, एकटा ब्राझिलच फुटबॉलचे सामने खेळवत सुटला आहे.

अर्जेटिंनामध्ये 4,200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अर्जेटिंनामध्ये आतापर्यंत 4200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, तरी सुद्धा अर्जेंटिनाच्या सरकारनं फुटबॉलच्या सामन्यांना परवानगी दिलेली नाही. मात्र, ब्राझिलचा कारभार राम भरोसे सुरु आहे. सरकारनं ना कोणत्याही लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ना तिथली जनता सुद्धा खबरदारी घेते आहे. त्यामुळे प्राण जाए, पर फुटबॉल ना जाए, असंच चित्र ब्राझिलचं आहे.

Brazil Football League

संबंधित बातम्या :

Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

Kim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *