AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40% टॅरिफ हटवा मगच दोस्ती… या बड्या देशाचा अमेरिकेला थेट विरोध, सुनावले खडेबोल

ट्रम्प प्रशासनाने यावर कोणतीही औपचारिक प्रतिक्रीया दिलेली नाही. व्हाईट हाऊसशी मीडियाने संपर्क केला तर त्यांना नो कमेंट असे सांगून उत्तर टाळण्यात आले आहे.

40% टॅरिफ हटवा मगच दोस्ती... या बड्या देशाचा अमेरिकेला थेट विरोध, सुनावले खडेबोल
| Updated on: Oct 06, 2025 | 11:36 PM
Share

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या टॅरिफ वरंवट्याखाली आपल्या सारखाच ठेचला गेलेल्या ब्राझीलने आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. ब्राझील सोबत जर आर्थिक भागीदारी मजबूत करायची असेल तर ब्राझीलच्या उत्पादनांवर लावलेला ४० टक्के टॅरिफ हटवावा असे थेट आव्हान ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लूला दा सिल्वा यांनी दिले आहे. सोमवारी दोन्ही नेत्यांची फोनवरुन अर्धा तास चर्चा झाली.त्यावेळी लूला यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ४० टक्के टॅरिफ मागे घ्या अन्यथा ब्राझीलही पावले उचलेल असे स्पष्ट सांगत आपली बाजू भक्कम केली आहे.

ट्रम्प प्रशासनाने भारतावर आधी २५ टक्के नंतर पुन्हा रशियाशी तेल खरेदी केल्याने अतिरिक्त दंड म्हणून २५ टक्के असा ५० टक्के टॅरिफ लावला आहे. ब्राझीलवरही भारता इतकाच टॅरिफ ट्रम्प यांनी लावला आहे. आज ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लूला दा सिल्वा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलणी केली आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेला माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी परस्परांचे फोन नंबर अदानप्रदान केले आणि पुढे संवाद कायम ठेवण्यावर सहमती व्यक्त केली. यावेळी लुला यांन ट्रम्प यांना बेलेममध्ये (Belem) होणाऱ्या आगामी ग्लोबल वार्मिंग परिषदेचे आमंत्रण देखील दिले.

अमेरिकेने जुलैमध्ये ब्राझीलच्या निर्यातीवर ४० टक्के नवा टॅरिफ लावला होता.याआधी ब्राझीलवर १० टक्के टॅरिफ लावला होता, त्यानंतर हा अतिरिक्त ४० टक्के टॅरिफ लावला,त्यामुळे ब्राझीलवरही ५० टक्के टॅरिफ लागला आहे. ही स्थिती भारतासारखीच आहे. भारतावरही खासकरुन स्टील आणि एल्युमिनियम सेक्टरवर जबरदस्त ड्यूटी लावण्यात आली होती. लूला यांनी ट्रम्पना सांगितले की या निर्णय अन्यायकारक आहे.कारण ब्राझील त्या तीन G20 देशांपैकी एक आहे ज्यांच्यासोबत अमेरिकेचा ट्रेड सरप्लस झालेला आहे. त्यांनी ट्रम्प यांना आठवण करुन दिली आहे की ब्राझीलने अमेरिकन निर्यातदारा फायदा होत असूनही अमेरिकेकडून अधिक सामान खरेदी केलेले आहे.

दोस्ती होईल तर बरोबरच्या अटींवर

लूला यांनी ट्रम्प यांच्याशी बोलताना सांगितले की ब्राझील निष्पक्ष व्यापाराचे समर्थन करतो. आम्हाला भागीदारी हवी आहे. परंतू अट ही आहे की समान व्यवहार व्हावा. जर ४० टक्के टॅरिफ हटवला नाही तर आमचे उद्योग आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाधित होतील.लुला यांचे हे वक्तव्य केवल आर्थिक नसून राजकीय संदेश देखील आहे. ब्राझील हे दाखवून देऊ इच्छितो की ब्राझील, अमेरिकेचा मित्र असूनही, त्याच्या आर्थिक सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही.

भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.