AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit 2025: अन्न आणि दारूमुळे भारत-जर्मनी पर्यटनाला चालणा मिळणार… शेफ कुणाल आणि जर्मन वाईन निर्मात्यांचं भाकीत

News9 Global Summit 2025: "न्यूज9 ग्लोबल समिट" कार्यक्रमात ... शेफ कुणाल आणि जर्मन वाईन निर्मात्यांनी नवीन भाकीत केलं आहे. त्यांनी अन्न आणि दारूवर महत्त्वाची चर्चा केली आहे.

News9 Global Summit 2025:  अन्न आणि दारूमुळे भारत-जर्मनी पर्यटनाला चालणा मिळणार... शेफ कुणाल आणि जर्मन वाईन निर्मात्यांचं भाकीत
फाईल फोटो
| Updated on: Oct 10, 2025 | 1:04 PM
Share

News9 Global Summit 2025: जर्मनीतील स्टुटगार्ट या औद्योगिक शहरामध्ये “न्यूज9 ग्लोबल समिट” कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षी, त्याची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली असून, ती 9 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. गेल्या वर्षीप्रमाणे, बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि जर्मनीमधील संबंध उंचावण्याचं उद्दिष्ट या समिटचं आहे. या समिटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांबद्दलही विशेष चर्चा झाली. यावेळी बीयर पासून चिकनवर अधिक जोर देण्यात आला. समिटमध्ये उपस्थित असलेले शेफ कुणाल कपूर आणि जर्मनीचे वाईन निर्माते यांनी पर्यटनावर देखील चर्चा केली. कुणाल कपूर आणि वाइननिर्माते अलेक्झांडर हेनरिक (वेनगुट हेनरिक आणि थॉमस डायहल) यांनी अन्न आणि वाइन पर्यटन भारत आणि जर्मनीला कसं जोडू शकते यावर चर्चा केली.

बीयरपासून बटर चिकनवर झाली चर्चा…

मॉडरेटर कृष्णा यांनी सत्राची सुरुवात केली आणि सांगितल की, देशाची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांद्वारे परिभाषित केली जात नाही तर त्याच्या किचनद्वारे देखील परिभाषित केली जाते. याच गोष्टीला दुजोरा देत कुणाल आणि अलेक्झांडर हेनरिक यांनी सांगितलं, भारतीय खाद्यपदार्थ आणि जर्मनच्या ड्रिंकमुळे दोन्ही देशांमधील पर्यटन मजबूत होऊ शकतं. जेव्हा वेगवेगळ्या संस्कृतींची चव एकत्र येते तेव्हा, ते केवळ एक नवीन पदार्थ तयार करत नाही तर एक नवीन अनुभव आणि वेगळी भावना देखील निर्माण करते… असं देखील ते म्हणाले.

भारतीय खाद्यपदार्थांबद्दल काय म्हणाले शेफ कुणार कपूर

सामान्यतः, इतर देशांमध्ये भारतीय अन्नाबद्दल असा समज आहे की भारतीय खाद्यपदार्थ मसालेदार आणि तिखट असतात. यावर कुणाल म्हणाले, ‘प्रत्येक भारतीय पदार्थ चवीला तिखट आणि मसालेदार असेल असं नाही… लोकांना असं वाटतं की भारतीय खाद्यापदार्थाची ओळख फक्त बटर चिकण आहे… पण असं बिलकूल नाही…’ असं कुणाल म्हणाले.

जगभरातील लोक भारतीय खाद्यपदार्थ पसंत करत आहेत.

कुणाल म्हणाले, ‘भारतीय खाद्यपदार्थ परिसर, ऋतू आणि संस्कृतीनुसार ते बदलत राहतात जर कोणी म्हणत असेल की, सर्व भारतीय खाद्यपदार्थ एकसारखे असतात, तर बिलकूल नाही. भारतीय खाद्यपदार्थांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जगभरातील देश भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. पूर्वी, भारतीय खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी, लोक म्हणायचे की ते थोडे कमी मसालेदार बनवा, पण आता लोकांना खऱ्या भारतीय जेवणाची चव घ्यायची आहे.’

‘परदेशात काम करणारे भारतीय शेफ भारताची चव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शेफ वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ बनवत आहे. त्यामुळे परदेशी लोकांना कळत आहे की, भारतीय खाद्यपदार्थ फक्त तिखट आणि मसालेदार नसून चविष्ट देखील असतात.’

वाइननिर्माते अलेक्झांडर हेनरिक यांनी देखील केलं मोठं वक्तव्य

वाइननिर्माते अलेक्झांडर हेनरिक यांना भारतीय स्ट्रीट फूड जास्त आवडतं. त्यांना नवनवीन पदार्थ खायला प्रचंड आवडतं. वाइननिर्माते अलेक्झांडर हेनरिक म्हणाले, ‘मी अनेकदा भारतात आलो आणि स्ट्रीट फूड खाल्लं आहे… जर्मनीमध्ये वाइन पर्यटन तेजीत आहे, म्हणूनच त्यांची वाइनरी आता सर्वांना आनंद देण्यासाठी व्हेगन आणि अल्कोहोल-मुक्त वाइन तयार करते.’

जर्मनी वाइनमेकिंगचे नवीन केंद्र बनलं आहे

अलेक्झांडर म्हणाले, ‘जर्मनी आता फक्त बीयरसाठीच नाही तर, वाईनसाठी देखील प्रसिद्ध आहे… स्ट्रासबर्गमध्ये वाइनमेकिंगची सुरुवात झाली. आमच्या वाइन सर्वांपेक्षा वेगळी आहेत. आम्ही अशा वाइन तयार करतो ज्या लाईट, सॉफ्ट आणि मसालेदार पदार्थांसोबत उत्तम प्रकारे जुळतात. आमच्या कमी अल्कोहोल असलेल्या, लाईट टॅनिन असलेल्या वाइन भारतीय खाद्यपदार्थांसोबत परिपूर्ण आहेत. जेव्हा भारतीय पदार्थ आणि जर्मन वाइन एकत्र येतात तेव्हा ते एक अनोखी चव निर्माण करतात.’

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.