चीनमध्ये रातोरात कोरोना रुग्णांची वाढ, 90 टक्के लोकांच्या खाण्यात फ्रोजन चिकनचा समावेश

कोरोना झालेल्या 90 टक्के लोकांनी फ्रोजन चिकन खाल्ल्याचं समोर आलं (China Corona Patient Increase After eat frozen chicken) आहे.

चीनमध्ये रातोरात कोरोना रुग्णांची वाढ, 90 टक्के लोकांच्या खाण्यात फ्रोजन चिकनचा समावेश

बिजींग (चीन) : जे पेरलं तेच उगवतं या म्हणीप्रमाणे चीननं जगभर वाटलेलं पाप आता चीनवरचं उलटतं आहे. कारण, जगाला कोरोना निर्यात करणाऱ्या चीनमध्येच आता कोरोना आयात होतो आहे. (China Corona Patient Increase After eat frozen chicken)

चीनच्या शेनजेन शहरात रातोरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. शेकडो लोकांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. ज्यांना-ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांची पूर्ण कुंडली काढली गेली. मात्र कोरोना झालेल्यांपैकी एकही व्यक्ती परदेशातून आलेला नव्हता किंवा एकही व्यक्ती चीनमधल्या दुसऱ्या शहरात सुद्धा गेलेला नव्हता. त्यामुळे गेल्या काही दिवसात त्यांच्या खाण्यात काय-काय आलं, याचा शोध घेतला गेला. त्यात कोरोना झालेल्या 90 टक्के लोकांनी फ्रोजन चिकन खाल्ल्याचं समोर आलं आणि चीनच्या आरोग्य यंत्रणाची झोप उडाली.

या घटनेनंतर शहरातली फ्रोजन चिकनची पाकिटं जप्त केली गेली. ब्राझिलमधून आयात झालेल्या फ्रोजन चिकनमध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आणि तातडीनं शेनजेनच्या लोकांसाठी फ्रोजन चिकन बंदीचं फर्मान काढलं गेलं. याआधी सुद्धा इक्वेडोरमधून आलेल्या झिंग्यामध्ये कोरोना सापडला होता. त्यामुळे चीननं तातडीनं झिंग्याची आयात बंद केली.

अनेक महिने टिकावं, म्हणून फ्रोजन चिकनवर प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेमुळे चिकनला अनेकांच्या हातांचाही स्पर्श होतो. शिवाय जिथून हे चिकन आलं, त्या ब्राझिलनं निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. भारतात सुद्धा फ्रोजन चिकन मिळतं. मात्र बहुतांश भारतीय थेट दुकानातून चिकन घेणं पसंत करतात.

चीनमधले काही लोक मात्र यामागे व्यापारयुद्ध सुद्धा मानतात. थेटपणे व्यापार बंद करता येत नाही. त्यामुळे चिनी सरकार परदेशातल्या वस्तूंना बदनाम करुन त्यांची विक्री रोखत असल्याचीही शंका आहे. पण, जर खरोखर फ्रोजन चिकनमध्ये कोरोना सापडला असेल, तर चीननं जगाला दिलेलं कोरोना गिफ्ट आता त्यांनाच रिटर्न मिळू लागलं आहे.  (China Corona Patient Increase After eat frozen chicken)

संबंधित बातम्या : 

चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी

Brazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तरीही फुटबॉल लीगचं आयोजन, रोनाल्डोकडूनही टीका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *