सुपरपॉवर अमेरिकेच्या गुप्त शस्त्रसाठ्यावर चीनचा डोळा, हल्ल्याच्या भीतीने अमेरिकाही सतर्क

जागतिक महासत्ता म्हणून ओळख मिळवणाऱ्या अमेरिकेला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे (Secret icland weapon storage of america).

  • अजय सोनवणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:29 PM, 23 Jul 2020
Donald Trump and Xi Jinping

वॉशिंग्टन : जागतिक महासत्ता म्हणून ओळख मिळवणाऱ्या अमेरिकेला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे (Secret icland weapon storage of america). एकिकडे कोरोना संसर्गाचा सामना करणाऱ्या अमेरिकेला आता त्यांच्या शक्तीशाली शस्त्रांच्या आगाराची काळजी वाटते आहे. हे शस्त्र आगार गुआम नावाच्या बेटावर आहे. समुद्राने वेढलेल्या या बेटावर वरवर पाहिलं तर अन्य पर्यटन बेटांप्रमाणेच काही लोक जमिनीवर चैनीनं जगताना दिसतील. मात्र, हे बेट त्या शेकडो बेटांपेक्षा निराळं आणि वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं.

जगात अशी सुंदर बेटं शेकडोंच्या संख्येनं आहेत. मात्र, वर-वर आपल्या नैसर्गिक सौदर्याने मोहित करणारं गुआम हे अमेरिकेचं छोटंसं बेट जगातलं सर्वात मोठं शस्रसाठ्याचं भंडार मानलं जातं. समुद्राच्या मधोमध असलेल्या त्या जमिनीच्या छोठ्याश्या तुकड्याची जगभर दहशत आहे. येथं असलेला शस्रसाठा अर्ध्या जगाला उद्ध्वस्त करु शकतो. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन आणि उत्तर कोरियापासून जवळ असलेला हा शस्रसाठा अमेरिकेची खरी ताकद मानला जातो.

जगभरात दहशत असलेल्या अमेरिकेच्या या शस्त्र आगार गुआम बेटावर हल्ला होणार असल्याची कुणकुण अमेरिकेला लागलीय. याआधी उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंगनं सुद्धा हे गुआम बेट उडवून देण्याची अनेकदा धमकी दिलीय. मात्र आता उत्तर कोरिया नव्हे, तर चीन या बेटावर हल्ला करण्यासाठी टपून बसलाय. अमेरिकेच्या नौदलानं नुकताच पेंटागॉनला एक गुप्त अहवाल सुपूर्द केलाय. यात काही आधुनिक मिसाईल्स सिस्टम तैनात करण्याची मागणी केली गेलीय. कारण, त्या अहवालानुसार चीनचं नौदल गुआम बेटावर हवाई हल्ला करण्याच्या बेतात असल्याची शंका व्यक्त करण्यात आलीय.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गुआमच्या बेटावर अमेरिकेनं ज्या मिसाईल तैनात केल्या आहेत, त्या मिसाईल्स बॅलेस्टिक आणि क्रूज मिसाईलचा सामना करण्यासाठी अपुऱ्या आहेत. त्यामुळेच अमेरिकेच्या नौदलानं पेंटागॉनकडे तातडीनं बॅलेस्टिक मिसाईल रवाना करण्याचा संदेश दिलाय. आता या गुआम बेटाची भौगौलिक स्थिती सुद्धा समजून घेण्यासारखी आहे. गुआम बेटाच्या आजूबाजूला छोटे-मोठे मिळून असंख्य देश आहेत. मात्र या प्रमुख देशांमध्ये फिलीपाईन्स, कोरिया, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा गुआमला वेढा आहे.

असंही सांगितलं जातं की खुद्द अमेरिकेत जितका शस्रसाठा आहे, त्यापेक्षा जास्त शस्रं अमेरिकेनं या बेटावर दडवून ठेवली आहेत. अमेरिकन नौदलाच्या जगभर वाजणारा डंका याच गुआम बेटाच्या जोरावर असल्याचं सांगितलं जातं. कारण याच बेटावर अमेरिकन नौदलाचं जगातलं सर्वात मोठं ऑपरेशनल बेस आहे. जगभरातल्या समुद्रांवर अमेरिकेन नौदलाची जहाजं बिनघोरपणे फिरतात. त्यामागे सुद्धा गुआम बेटावर असलेला शस्रसाठा आणि या बेटाचं भौगोलिक स्थान या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. जुन्या कथांमध्ये जसा एखाद्या बलाढ्य व्यक्तीचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसाच अमेरिकन नौदलाची ताकदही गुआम बेटात दडलीय.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सर्वशक्तिमान अमेरिका सनकी किम जोंगला घाबरुन का असते, त्यामागचं कारण सुद्धा गुआम बेटच आहे. कारण, आजवर किम जोंगनं अनेकदा हे गुआम बेट अणुहल्ल्यानं उडवून देण्याची धमकी दिलीय. जर गुआम अमेरिकेच्या हातून गेलं, तर समुद्रातून अमेरिकन नौदलाची सत्ता जाण्यासारखंच आहे. दक्षिण चिनी समुद्रात अमेरिका चीनला घेरतोय. चीन त्याचा वचपा म्हणून अमेरिकेच्या गुआम बेटावर डोळा ठेवून आहे. पण गुआमला धक्का लावणं म्हणजे अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली जागेला आव्हान देण्यासारखं आहे. जर गुआममध्ये युद्धाची ठिणगी पडली, तर तो वणवा अख्ख्या जगभरात युद्धाच्या स्वरुपात भडकेल यात शंका नाही.

हेही वाचा :

India China Conflict | चीनचा दुतोंडीपणा, पँगाँग, शिनजियांग भागात चिनी सैन्य तैनात

चीनविरोधात 9 देशांची एकजूट, अमेरिकेची आक्रमकता, युद्धाचे संकेत?

जगातील सर्वात मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता, चीनच्या अनेक राज्यांत महापूर

Secret icland weapon storage of america