नेपाळने जपली मैत्री…भारताशिवाय नवीन संघटना अशक्य, चीन-पाकिस्तान-बांगलादेशला दाखवला आरसा
SAARC China Pakistan News: चीन आणि पाकिस्तान दोन्ही देश मिळून नवीन ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भारताला वगळण्याची रणनीती या देशांची आहे. भूतान भारताचा मित्र राष्ट्र आहे. त्यामुळे या संघटनेत भूतानसुद्धा सहभागी होणार नाही.

SAARC China Pakistan News: भारताला वगळून नवीन सार्क संघटना स्थापन करण्याचा चीन, पाकिस्तान, बांगलादेशच्या निर्णयास मोठा धक्का बसला आहे. भारताचा मित्र राष्ट्र नेपाळने या तिन्ही देशांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. भारताशिवाय नवीन सार्क संघटना बनवण्यास आपला विरोध असल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे. नेपाळकडे सध्या सार्कचे अध्यक्षपद आहे. तसेच नेपाळमध्येच सचिवालय आहे.
चीनमध्ये तिन्ही राष्ट्रांची बैठक
पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश या तिन्ही राष्ट्रांची काही दिवसांपूर्वी चीनमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीत भारताला घेरण्यासाठी नवीन सार्क बनवण्याचा पर्यायावर विचार करण्यात आला. त्या बैठकीतील माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानने नवीन सार्क बनवण्याचा आपला कोणताही उद्देश नसल्याचे म्हटले आहे.
नेपाळचा नवीन सार्कला विरोध
इकनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, नेपाळची नवीन सार्कमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही. भारताला वगळून नवीन सार्क तयार करु नये, असे नेपाळने म्हटले आहे. यापूर्वी शेवटची सार्क परिषद २०१६ मध्ये काठमांडूत झाली होती. त्यानंतर १९ वी सार्क परिषद २०१६ मध्ये इस्लामाबादमध्ये होणार होती. परंतु उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत या बैठकीत सहभागी झाला नव्हता. त्यामुळे ती परिषद स्थगित करण्यात आली.
भूतान काय करणार?
चीन आणि पाकिस्तान दोन्ही देश मिळून नवीन ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भारताला वगळण्याची रणनीती या देशांची आहे. भूतान भारताचा मित्र राष्ट्र आहे. त्यामुळे या संघटनेत भूतानसुद्धा सहभागी होणार नाही. यामुळे चीन, पाकिस्तान भूतानला आमंत्रण देणार नाही. सार्कवर भारताचा असलेला प्रभाव लक्षात घेता पाकिस्तान चीनला या संघटनेत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत होतो. मागील महिन्यात चीनच्या कुनमिंग शहरात बैठक झाली. त्या बैठकीनंतर नवीन सार्क बनवण्याच्या योजनेत चीनचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने शस्त्रांपासून उपग्रहापर्यंत सर्व मदत पाकिस्तानला दिली होती. तसेच चीनकडून बांगलादेशसोबत संबंध दृढ करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दिल्ली आणि बीजिंगमधील संबंध सुधारत असताना चीनकडून या पद्धतीची पावले उचलली जात आहे. नुकतीच कैलाश मानसरोवर यात्राही सुरु झाली आहे. तसेच एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर चीन दौऱ्यावर गेले आहेत.
