China Air Crash | विमान जाणुनबुजून 29000 फुटांनी खाली? 132 प्रवाशांचा जीव घेणाऱ्या चीन विमान दुर्घटनेबद्दल धक्कादायक दावे

China Air Crash | विमान जाणुनबुजून 29000 फुटांनी खाली? 132 प्रवाशांचा जीव घेणाऱ्या चीन विमान दुर्घटनेबद्दल धक्कादायक दावे
चीनमध्ये विमान दुर्घटना
Image Credit source: ट्विटर

वॉल स्ट्रीट जनरलने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेल्या माहितीवरून असे दिसून येते की कॉकपिटमधील व्यक्तीला इनपुट देण्यात आले होते, ज्यामुळे हा विमान अपघात झाला.

अनिश बेंद्रे

|

May 18, 2022 | 1:00 PM

बीजिंग : मार्चमध्ये चीनमध्ये मोठा विमान (China Air Crash) अपघात झाला होता. ईस्टर्न एअरलाइन्सचे (Eastern Airlines Flight Crash) विमान कोसळून झालेल्या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला होता. आता या विमान अपघाताबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. शेवटच्या क्षणी विमान जाणूनबुजून खाली आणले गेले असावे, असा दावा अहवालात केला जात आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील (Black Box) डेटाचे विश्लेषण करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीच्या प्राथमिक निकालांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

हे विमान कनमिंगहून ग्वांगझोउला जात असताना वुझोऊमध्ये क्रॅश झाले होते. वॉल स्ट्रीट जनरलने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेल्या माहितीवरून असे दिसून येते की कॉकपिटमधील व्यक्तीला इनपुट देण्यात आले होते, ज्यामुळे हा विमान अपघात झाला. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कॉकपिटच्या सूचनेनुसारच विमानाने मार्गक्रमण केले.

29,000 फुटांनी खाली

ईस्टर्न फ्लाइट MU5735 हे ग्वांगझोउला पोहोचण्याच्या एक तासाहून कमी काळापूर्वी क्रॅश झाले. या विमान अपघाताचा व्हिडीओही समोर आला होता. फ्लाईट ट्रॅकिंग सर्व्हिस फ्लाइटरडारने नोंदवलेल्या माहितीनुसार, बोईंग 737-800 जेट क्रॅश होण्याच्या दोन मिनिटांआधी 29,000 फुटांनी खाली उतरले होते.

वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार आता जी माहिती समोर आली आहे ती प्राथमिक होती आणि आता या प्रकरणी अधिक माहिती समोर येऊ शकते, तेव्हा अपघाताच्या वेळी काय झाले हे स्पष्ट होईल.

कारणांविषयी गूढ कायम

यापूर्वी 20 एप्रिल रोजी चीन एव्हिएशन रेग्युलेटरने एक प्राथमिक अहवाल जारी केला होता, ज्यामध्ये विमानात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याचे सांगण्यात आले होते. अपघात होईपर्यंत विमान सामान्य स्थितीत होते. मात्र, हे विमान कसे कोसळले हे या अहवालात सांगण्यात आलेले नाही.

अपहरणाच्या शक्यतेने क्रॅश लँडिंग?

वॉल स्ट्रीट जनरलने आपल्या सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, विमानातील कोणीतरी कॉकपिटमध्ये घुसून जाणूनबुजून अपघात घडवून आणला असण्याची शक्यता आहे. विमान अपहरणाच्या अनेक घटनांमध्ये अपघाताच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी. 1999 नंतर वैमानिकांनी जाणूनबुजून विमान अपघाताची घटना दोनदा समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

1999 मध्ये इजिप्तएअर फ्लाइट 990 च्या कॉकपिटमधील फर्स्ट ऑफिसरने विमानाचा कॅप्टन विश्रांतीसाठी गेला असताना ऑटोपायलट आणि इंजिन बंद केले. हे विमान अटलांटिक महासागरात कोसळले होते. या अपघातात 217 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे मार्च 2015 मध्ये जर्मनविंग फ्लाइट 9525 च्या फर्स्ट ऑफिसरने कॅप्टनला कॉकपिटच्या बाहेर लॉक केले होते आणि विमान फ्रान्समधील पर्वतांमध्ये कोसळले होते. या अपघातात 150 जणांचा मृत्यू झाला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें