AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हाय अलर्टवर राहा आणि युद्धाची तयारी करा”, चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

हाय अलर्टवर राहा आणि युद्धाची तयारी करा, चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा सैन्याला आदेश
| Updated on: Oct 14, 2020 | 11:28 PM
Share

बीजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार जिनपिंग यांनी चीनच्या एक मिलिट्री बेसला भेट दिली तेव्हा सैनिकांना आपली पूर्ण बुद्धी आणि ऊर्जा युद्धाची तयारी करण्यावर खर्च करण्यासाठी वापरा, असे सांगितले. (China president Xi jinping instruct soldiers to be prepare for war amid tention with India America and Taiwan)

चीनची वृत्तसंस्था Xinhua न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जिनपिंग मंगळवारी (13 ऑक्टोबर) चीनच्या गुआंगडोंग येथील एका मिलिट्री बेसच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सैनिकांना संबोधित करताना त्यांनी युद्धाची तयारी करण्यास सांगितले. तसेच हाय अलर्ट राहून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

जिनपिंग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मॅरीन कॉर्प्स या बेसचा आढावा घेण्यासाठी गेले होते. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी सैनिकांना इमानदार, अगदी शुध्द आणि विश्वासार्ह होण्याचं आवाहन केलंय.

जिनपिंग गुआंगडोंगमध्ये शेनझेन स्पेशल इकोनॉमिक झोनच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. भारत, अमेरिका आणि तैवानसोबत सध्या चीनचे संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. त्यापार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी दिलेला इशारा महत्वाचा मानला जात आहे.

चीनला शह देण्यासाठीच अमेरिकेने तैवानला 3 विशेष वेपन सिस्टम दिल्या आहेत. या निर्णयाने चीनची चांगलीच आगपाखड झाली. कारण आजही चीन तैवानवर आपला दावा करतो आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, “अमेरिकेने तैवानला कोणत्याही प्रकारची हत्यारे देण्याचा करार रद्द करावा.”

संबंधित बातम्या

उत्‍तर कोरियाचा प्रमुख आणि जगप्रसिद्ध हुकुमशाह किम जोंग नागरिकांसमोर का रडला?

जगभरातील 150 टॉप मॉडेल, गुप्तरोगांची चाचणी करुन प्रवेश, सौदीच्या प्रिन्सच्या मालदीवमधील पार्टीची जोरदार चर्चा

Nobel Peace Prize | ‘युद्धजन्य भागातही पोटाची भूक शमवली’, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला

(China president Xi jinping instruct soldiers to be prepare for war amid tention with India America and Taiwan)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.