AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी, मुलांना सोडून गुहेत जाऊन बसला, आता 40,000 फॉलोअर्ससह मालामाल

चीनच्या सिचुआन प्रांतातील मिन हेंगकाई यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शहरी जीवन सोडून गुहेत राहण्यास सुरुवात केली. ते सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून त्याचे 40 हजार फॉलोअर्स आहेत.

पत्नी, मुलांना सोडून गुहेत जाऊन बसला, आता 40,000 फॉलोअर्ससह मालामाल
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 10:17 AM
Share

चीनमधील एका ट्रक ड्रायव्हरने कर्ज घेण्याची मर्यादा ओलांडली. बघता बघता त्याच्यावर इतकं कर्ज आलं की तो दिवसरात्र कामाला लागला. कुटुंब आणि घर चालवण्याच्या टेन्शनने तो प्रचंड त्रस्त झाला होता. मग एके दिवशी चीनच्या सिचुआन प्रांतातील 35 वर्षीय मिन हेंगकाई यांनी सर्व काही सोडून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला.

शहरी जीवन, नोकरी, लग्न अशा सामाजिक व्यवस्था पूर्णपणे सोडून गेल्या चार वर्षांपासून ते गुहेत एकटेच राहत आहेत. निराशा असूनही ते सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांचे 40 हजार फॉलोअर्स आहेत. ज्यामुळे ही व्यक्ती चांगली कमाई करते.

हेंगकाई महिन्याला 10 लाख रुपये कमवतात

साऊथ चायना मॉर्निंगच्या रिपोर्टनुसार, ड्रायव्हर म्हणून दरमहा सुमारे 10,000 युआन (सुमारे 1,400 किंवा 1.15 लाख रुपये) कमवत होते. पण कामाचे लांबलचक तास आणि वाढते कर्ज यामुळे ते मानसिकदृष्ट्या थकले होते.

“मी फक्त कर्ज फेडण्यासाठी दिवसाला 10 तासांपेक्षा जास्त काम करायचो.’’ जेव्हा त्यांनी शहरी जीवन सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यावर सुमारे 42,000 डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) चे कर्ज होते. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न त्यांनी सोडला. त्यांच्या कुटुंबाने त्यांचे काही सामान विकून त्याचे काही कर्ज फेडले. त्यानंतर त्यांनी गावातील एका रहिवाशाकडून जमीन बदलून एक गुहा ताब्यात घेतली आणि आपल्याकडे असलेल्या सहा हजार डॉलरच्या बचतीतून 50 चौरस मीटरच्या या गुहेचे साध्या घरात रूपांतर केले. त्यांचं आयुष्य आता खूप सोपं झालं आहे. सकाळी 8 वाजता उठतात, शेतात काम करतात आणि रात्री 10 वाजता झोपतात. ते मुख्यत: स्वतःचे अन्न पिकवतात आणि इतर खर्च फारच कमी करतात.

लग्न आणि प्रेम व्यर्थ

मीनचे मत आहे की, लग्न म्हणजे वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे. ते म्हणता की खरे प्रेम मिळणे फार दुर्मिळ आहे. मग जे शोधणे इतके कठीण आहे त्यासाठी मी कठोर परिश्रम का घ्यावेत? याच कारणामुळे त्यांनी नोकरी तर सोडलीच, पण नातेसंबंधही शोधले नाहीत. त्यांच्या मते हे त्याच्या अस्तित्वाच्या महत्त्वहीनतेचे प्रतीक आहे.

सोशल मीडियावर अजूनही अ‍ॅक्टिव्ह

आश्चर्याची बाब म्हणजे आधुनिक जीवनापासून स्वत:ला दूर ठेवूनही मीन सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह आहे. त्यांचे 40,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि नियमितपणे त्यांच्या गुहेच्या जीवनाची झलक शेअर करतात. मीन यांची कथा अनोखी आहे, पण एकटी नाही. अमेरिकन डॅनियल सुएलो ने 2000 मध्ये पैसे सोडले आणि 10 वर्षांहून अधिक काळ युटामधील एका गुहेत राहिला. तर इटलीचा माउरो मोरांडी 30 वर्ष एका बेटावर एकटाच राहत होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.