AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात गृहयुद्धाची परिस्थिती, लष्कर आणि इमरान समर्थकांत रक्तरंजित संघर्ष

पाकिस्तानाच माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी इमरान यांच्या तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद येथे धुडघुस घातला आहे. इमरान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीवी यांनी पक्षाचा ताबा घेतला असून आंदोलन सुरु केले आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाची परिस्थिती, लष्कर आणि इमरान समर्थकांत रक्तरंजित संघर्ष
| Updated on: Nov 26, 2024 | 9:15 PM
Share

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद युद्धाचे मैदान बनली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान इमरान खान यांचे समर्थकांत आणि पाकिस्तानच्या लष्करात जोरदार संघर्ष सुरु आहे. इमरान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ ( पीटीआय ) चे समर्थकांनी इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हिंसक प्रदर्शन सुरु केले आहे. या संघर्षात पीटीआयच्या दोन कार्यकर्ते आणि लष्कराचे तीन जवान यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. इमरान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांनी पक्षाचा ताबा घेतला असून त्यांनी इतर नेत्यांचे ऐकणे सोडून दिले आहे.

पाकिस्तानात इमरान खान समर्थक आणि दुसरीकडे जनरल आसिम मुनीर यांच्या सैन्यात जोरदार धुमश्चंक्री सुरु आहे.इमरान सर्मथकांना रोखण्यासाठी कंटेनरच्या उभ्या केलेल्या भिंती ओलांडून इमरान समर्थक घुसले आहेत. इमरान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांना मोर्चा काढला आहे. त्यांना रोखण्यासाठी सैन्याने कंटेनरच्या भिंती उभ्या करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे इमरान समर्थक संतप्त झालेले आहेत.

शहबाज सरकारने दावा केला आहे इमराम समर्थकांच्या हल्ल्यात पाकिस्तान रेंजर्सच्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. इमरान समर्थकांनी तीन रेंजर्सना आपल्या गाड्या खाली चिरडल्याचा आरोप होत आहे. इस्लामाबादच्या डी -चौकात पोलिस आणि पीटीआय कार्यकर्त्यांत हिंसक झडप झाली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी इस्लामाबाद आयजींना कसेही करुन परिस्थिती नियंत्रित आणण्याचे आदेश दिले आहेत.

इंटरनेट सेवा बंद

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कश्मीरमध्ये आंदोलकांवर पॅलेट गनच्या वापराबद्दल टीका करीत असतो. मात्र,पाकिस्तान या आंदोलकांवर पॅलेट गनचा मारा करीत आहे. या गनमधून प्लास्टीकचे छर्रे उडून अंधत्व येण्याची शक्यता असते. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर गोहर अली खान यांनी सरकारने निर्दोष लोकांवर गोळीबार करु नये असे आवाहन केले आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....