AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pope Francis : समलिंगी जोडप्यांविषयी पोप फ्रान्सिस यांचे वक्तव्य, क्रांतीची नांदी की मोठेपण

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांच्या एका विधानाने सध्या जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या नवीन सुचविलेल्या पर्यायावरुन उलटसूलट चर्चा सुरु आहे. काही धर्ममार्तंडांना हा विषय हाताळण्याची गरज वाटत नाही. तर इतर धर्मियांच्या पण संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. पोप यांचे हे वक्तव्य इतके सहज आणि साधे नाही, त्यामुळेच जगभरात चर्चा सुरु आहे.

Pope Francis : समलिंगी जोडप्यांविषयी पोप फ्रान्सिस यांचे वक्तव्य, क्रांतीची नांदी की मोठेपण
| Updated on: Oct 03, 2023 | 6:55 PM
Share

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्या एका वक्तव्याने सध्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पोप फ्रान्सिस यांना एकविसाव्या शतकातील पोप का म्हणतात, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. ते 266 वे पोप आहेत. व्हॅटकिन सिटीतील कुजबूज पण जगातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी महत्वाची असते. येथे तर पोप फ्रान्सिस यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली नसेल तर नवलच. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रे प्रगतीशील म्हणून ओळखली जातात. यातील काही देशांनी समलिंगी संबधांना मोकळीक दिली असली तरी अजूनही अनेक देशात या संबंधांना पुरेसे बळ मिळालेले नाही. त्यातच पोप फ्रान्सिस यांच्या वक्तव्याने समलिंगी जोडप्यांचा ( Same Sex Couples) विषय ऐरणीवर आला आहे.

काय म्हणाले पोप

कॅथेलिक चर्चला समलिंगी जोडप्यांना आशिवार्द प्रार्थनांना मोकळीक असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी सुचवले आहे. एका प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी याविषयीचे विचार मांडले. समलिंगी जोडप्यांचे लग्न, त्यांना आशिर्वाद देण्याच्या अनुषंगाने या प्रश्नाचा रोख होता. त्यावर आपण न्यायाधीश होता कामा नये की जे नाकारतात, मनाई करतात अथवा वगळतात, असे उत्तर पोप यांनी दिले. याविषयीचे त्यांचे विचार त्यांनी बिनदिक्कतपणे मांडले.

हे पापच

पण पुढे बोलताना त्यांनी समलिंगी संबंध हे वस्तूनिष्ठपणे पाहिल्यास पापच असल्याचे मत मांडले आणि समलिंगी विवाहांना मान्यता देणार नाही, असे स्पष्ट केले. बेल्जियम आणि जर्मनीसह अनेक देशांतील बिशप समलिंगी जोडप्यांना आशिर्वाद देत असल्याचे समोर आले आहे. पण चर्चच्या प्रशासनाने याविषयी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चर्च ऑफ इंग्लंडमधील वरिष्ठांनी समलिंगी जोडप्यांना आशिर्वादाच्या प्रार्थनांना परवानगी देण्यास पाठिंबा दर्शविला होता.

पोप यांच्या वक्तव्याची दखल

पोप यांनी समलिंगी जोडप्यांच्या आशिवार्द प्रार्थनेविषयी मांडलेले हे मत जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. जगात अजूनही समलिंगी संबंधाविषयी समाजाच्या, धर्माच्या भावना तीव्र आहेत. या संबंधांना विरोध आहे. जाहिररित्या असे संबंध ठेवण्याबाबत समाजाचा आक्षेप सगळीकडेच कायम आहे. त्यामुळे पोप यांच्या या वक्तव्याची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.